पोलीस अधीक्षकांना केंद्राचे इंटेलिजेन्स मेडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:15+5:302021-01-03T04:37:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना केंद्र ...

Centre's Intelligence Medal to Superintendent of Police | पोलीस अधीक्षकांना केंद्राचे इंटेलिजेन्स मेडल

पोलीस अधीक्षकांना केंद्राचे इंटेलिजेन्स मेडल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना केंद्र शासनाने इंटेलिजेन्स मेडल, तर राज्य शासनाने विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये गडचिरोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गम व अतिसंदेनशील नक्षलग्रस्त भागात नागरिकांचा विश्वास संपादन करून गोपनीय खबऱ्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे गडचिरोली तसेच छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातूनही गोपनीय माहिती मिळण्यास मदत झाली. त्यांनी निर्माण केलेल्या बातमीदारांच्या जाळ्यामुळे सी - ६० पथकांना गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षल संवेदनशील भागात तसेच छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात नक्षलीविरोधी मोहिमा यशस्वी करता आल्या. या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना इंटेलिजेन्स मेडल जाहीर केले आहे. तसेच त्यांच्यासह राज्यातील सात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनाही हा सन्मान मिळाला आहे.

त्याचबरोबर पोलीस अधीक्षक बंसल यांनी गडचिरोली भागात सलग दोन वर्षे सेवा करून उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाने त्यांना विशेष सेवा पदकही जाहीर केले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याहस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

चौकट :

फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनाही विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. ऑगस्ट २०१७ पासून २०१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच त्यांच्या कार्यकालात ७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. याबाद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

हाफ फोटो दि.०१सातारा अजय कुमार बंसल एसपी फोटो...

हाफ फोटो दि. ०१ सातारा तानाजी बरडे...

............................................................

Web Title: Centre's Intelligence Medal to Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.