शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'मध्य रेल्वे'चे महाबळेश्वरातील ‘हॉलीडे होम’ अखेर सील, वन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:53 IST

वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वे विभागाने भाडेपट्ट्याचे नूतनीकरण न केल्याने वन विभागाकडून मध्य रेल्वेच्या महाबळेश्वर येथील हॉलीडे होमला टाळे ठोकळे.

महाबळेश्वर : वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वे विभागाने भाडेपट्ट्याचे नूतनीकरण न केल्याने वन विभागाकडून मध्य रेल्वेच्या महाबळेश्वर येथील हॉलीडे होमला टाळे ठोकळे. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली पाच एकर मिळकत वन विभागाने ताब्यात घेतली असून, ही मिळकत सील केल्याची माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.वन विभागाने वेण्णा लेकच्या मागील बाजूच्या क्षेत्रातील महाबळेश्वर रस्त्यावर फॉरेस्ट सर्व्हे नंबर २२३ मधील पाच एकर जागा १९७८ मध्ये मध्य रेल्वेला दहा वर्षांसाठी भाडेपट्टा कराराने दिली होती. या जागेत मध्य रेल्वेने आपले हॉलीडे होम बांधले. हा करार १९८८ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर मध्य रेल्वेने कराराचे नूतनीकरण करणे आवश्यक होते; परंतु नूतनीकरण न केल्याने वन विभागाने ही मिळकत ताब्यात घेतली. त्यानंतर रेल्वेने करार वाढवून घेतल्याने वन विभागाने पुन्हा पाच एकर जागा मध्य रेल्वेकडे हस्तांतर केली.त्यावेळी केलेल्या कराराची मुदत संपुष्टात येताच वन विभागाने नोटिसा पाठवून कराराचे नूतनीकरण करण्याबाबत मध्य रेल्वेला सूचित केले. तसेच नूतनीकरण न केल्याने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागाने दिला होता. तरी देखील मध्य रेल्वेने याकडे दुर्लक्ष केले. अखेर सातारा उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी केलेल्या सूचनेनुसार सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांनी मध्य रेल्वेवर कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी विशेष पथकासह मंगळवारी रेल्वे हॉलीडे होम गाठले. तेथील रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून हॉलीडे होम ताब्यात घेतले. हॉलीडे होमच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाळे ठोकून ही पाच एकर मिळकत सील करण्यात आली.या कारवाईवेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रमेश गडदे, अभिनंदन सावंत आदी उपस्थित होते. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन विभागाच्या मिळकतदारांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानrailwayरेल्वे