कोरोनाच्या संकटात ऑनलाइन योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:29+5:302021-06-23T04:25:29+5:30
वाई : कोरोनाकाळात जागतिक योग दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयात, पतंजली समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग सामाजिक संस्थानी ऑनलाइन योगा केला. काही ...

कोरोनाच्या संकटात ऑनलाइन योग दिन साजरा
वाई : कोरोनाकाळात जागतिक योग दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयात, पतंजली समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग सामाजिक संस्थानी ऑनलाइन योगा केला. काही ठिकाणी योगसाधकांनी सामासिक अंतराच्या नियमांचे पालन करून तर अनेकांनी घरीच योगसाधना करून योग दिवस साजरा केला. पतंजली योग समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात योगशिक्षकाच्या माध्यमातून नियमांचे पालन करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
वाई येथे पतंजली योग समितीच्या वतीने सामासिक अंतराच्या नियमांचे पालन करून योग दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ योगशिक्षक धनंजय मलटणे यांनी योगा हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. योगामुळे आरोग्य निरोगी राहून प्रतिकारशक्ती वाढते,’ असे मत व्यक्त केले.
सुभाष यादव म्हणाले, ‘निरोगी जीवन व्यतित करण्यासाठी नियमित योगा, प्राणायाम करणे आज काळाची गरज आहे. भारतात योग संस्कृती ही फार पूर्वीपासून चालत आली असून योगसंस्कृती ही भारताने जगाला दिलेली देण आहे.’
पतंजली योग समितीच्या वतीने जिल्हाभर कोरोनाच्या नियमांचे पालन करून योग दिवस साजरा केल्याची माहिती भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष नीलेश पिसाळ यांनी दिली.