नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा : देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:28+5:302021-09-11T04:40:28+5:30
कोयनानगर : ‘राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासनाने काही निर्बंध घालून ...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा : देसाई
कोयनानगर : ‘राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करून गणेशोत्सव सण साजरा करावा लागणार आहे. दहा दिवस साजरा केला जाणारा हा सण शांततेच्या वातारणामध्ये नियमांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेऊन आपण सर्वजण साजरा करावा,’ असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले.
मंत्री देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘प्रतिवर्षी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाचे आगमन नेहमी उत्साही, आनंदी व जल्लोषाचेवातावरण निर्माण करणारे आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण अत्यंत साधेपणाने, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्वजण साजरा करीत आहोत. त्यामुळे हा सण साजरा करताना काही मर्यादाही येऊ लागल्या असल्या, तरी राज्यातील नागरिक या नियमांचे पालन करून सण साजरा करत आहेत.’
‘राज्यावरील कोरोना संसर्गाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करून हा सण साजरा करावा लागणार आहे. दहा दिवस साजरा केला जाणारा हा सण शांततेच्या वातावरणात, नियमांचे पालन करून, कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेऊन आपण सर्वजण साजरा करावा. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राहण्याच्यादृष्टीने सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.