लोकनेत्यांची जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST2021-03-13T05:10:21+5:302021-03-13T05:10:21+5:30

पाटण : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, माजी गृहमंत्री दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांची १११ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी ...

Celebrate the birthday of the people's leader simply | लोकनेत्यांची जयंती साधेपणाने साजरी

लोकनेत्यांची जयंती साधेपणाने साजरी

पाटण : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, माजी गृहमंत्री दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांची १११ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई येथे शासकीय निवासस्थानी बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र व शताब्दी स्मारक येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आणि सामाजिक अंतर ठेवून लोकनेत्यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कारखान्याचे सभासद उपस्थित होते. देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Web Title: Celebrate the birthday of the people's leader simply