‘लोकमत’चा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST2021-09-10T04:47:34+5:302021-09-10T04:47:34+5:30
सातारा : ‘लोकमत’ सातारा आवृत्तीच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. तसेच वर्धापन दिनानिमित्त प्रसिध्द ...

‘लोकमत’चा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सातारा : ‘लोकमत’ सातारा आवृत्तीच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. तसेच वर्धापन दिनानिमित्त प्रसिध्द केलेल्या ‘नवनिर्माण’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात उपस्थित राहून ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या नवनिर्माण पुरवणीचे प्रकाशन केले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकमत वृत्तसमूहाचा गवगवा असल्याचे सांगितले. लोकमतने अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच प्रशासनाच्या सकारात्मक कामातदेखील बळ दिले. हा वृत्तसमूह दिवसेंदिवस वाढतो आहे. दिल्लीत देेखील लोकमत वाचला जातो. अनेक समस्या सोडवताना आम्हाला लोकमतमधील बातम्यांचा आधार घ्यावा लागला आहे. लोकमतची साताऱ्यातील संपूर्ण टीम चांगल्या पध्दतीने काम करत आहे, असे या मान्यवरांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी सकाळी येथील खिंडीतील गणपतीचरणी नवनिर्माण पुरवणी ठेवण्यात आली. या ठिकाणी अंकाचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, मुख्य उपसंपादक दीपक शिंदे व लोकमतचे इतर सहकारी उपस्थित होते.
कोट...
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकमतचे जाळे मोठे आहे. सकारात्मकतेनं या वृत्तसमूहाची वाटचाल सुरू आहे. बातम्यांमधील विविधता आणि विस्तृत माहिती हे वर्तमानपत्र वाचताना मिळते. लोकमतमुळे प्रशासनालाही कामकाज करताना अधिक ऊर्जा मिळते आहे. लोकमतच्या सातारा आवृत्तीच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त या समूहाला मी शुभेच्छा देतो.
रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी, सातारा
कोट...
‘लोकमत’ने कोरोना काळात समाजाला बळ देण्याचे काम केले आहे. या वृत्तसमूहाची दमदार वाटचाल उल्लेखनीय आहे. समाजाला बळ देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. दोन वर्षांतील कोरोनाचे संकट असो अथवा पूरपरिस्थितीमुळे जी हानी झाली, त्या सर्वच ठिकाणी लोकमतची टीम रस्त्यावर उतरुन वास्तव परिस्थिती मांडत होती. आम्ही ते पाहत होतो. १५ व्या वर्धापनदिनानिमित्त यापुढेही हे वृत्तसमूह असेच वाढावे, यासाठी मी देवापुढे प्रार्थना करतो.
अजयकुमार बन्सल, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा
फोटो ओळ : सातारा येथील ‘लोकमत’ कार्यालयात पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल आणि प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याहस्ते ‘लोकमत’ने वर्धापनदिनानिमित्त प्रसिध्द केलेल्या ‘नवनिर्माण’ पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. (छाया : जावेद खान)