शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

कॅमेऱ्यात कैद झाले, चोरट्यांनी सीसीटीव्हीसह डीव्हीआरही लांबविला

By दत्ता यादव | Published: December 19, 2023 6:34 PM

सातारा : दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील माल चोरला. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत आपण कैद झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी  ...

सातारा : दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील माल चोरला. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत आपण कैद झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी सीसीटीव्हीसह डीव्हीआरही चोरून नेला. ही घटना दि. १७ ते १८ डिसेंबर या कालावधीत वाढे फाटा, ता. सातारा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुधीर निवृत्ती शिंदे (वय ४२, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) यांचे वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्यावर जयहिंद फर्निचर व भांडी दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तांबे, पितळेची भांडी चोरली. परंतु सीसीटीव्हीत कैद झाल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही, महागड्या कंपनीचा डीव्हीआर, असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीcctvसीसीटीव्ही