महापुरुषांना जातीच्या भिंती : निरंजन फरांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:02+5:302021-01-10T04:30:02+5:30
लोणंद : समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या महापुरुषांना जातीच्या भिंतीत अडकविणे हे पाप असून, ते समाजाच्या अधोगतीचे ...

महापुरुषांना जातीच्या भिंती : निरंजन फरांदे
लोणंद : समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या महापुरुषांना जातीच्या भिंतीत अडकविणे हे पाप असून, ते समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे, असे प्रतिपादन प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.
लोणंद येथे आयोजित केलेल्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे प्रमुख अजित क्षीरसागर होते. तर ज्येष्ठ मार्गदर्शक एन. डी. क्षीरसागर, उत्सव समितीचे संस्थापक अजित महादेव क्षीरसागर, भाजपा युवा मोर्चाचे लोणंद शहराध्यक्ष जयेश कुदळे यांची उपस्थिती होती. लोणंदमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचे हे १४ वे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
प्रा. फरांदे म्हणाले, सर्वच धर्मांनी कमी-अधिक प्रमाणात स्त्रीवर लादलेल्या दुय्यमतेचा विचार केला तर सावित्रीच्या कार्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते. सावित्रीबाईंनी १९ व्या शतकात भारतीय स्त्री जीवनाच्या दिशाच बदलण्याचे ऐतिहासिक कार्य केले. अबला, अनाथ बालके, विधवा, वंचित समाज या सर्वांना पोटाशी धरणाऱ्या सावित्रीबाईंच्या कार्यामुळे आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करताना आपण पाहत आहोत. त्यांच्या या कार्याबद्दल आपण कृतज्ञ आहे.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रदीप क्षीरसागर, नामदेव क्षीरसागर, समता परिषदेचे खंडाळा तालुकाध्यक्ष महादेव क्षीरसागर, संजय माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.