शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कास पठार यंदा ‘लॉकडाऊन’च! ३० ते ३५ प्रकारची फुले फुलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 5:47 AM

प्रदूषण नसल्याने जैवविविधता खुलली

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विविधरंगी रानफुलांचा अलौकिक आविष्कार असलेला ‘कास पठार’ सध्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. येथील ३० ते ३५ प्रकारच्या फुलांचा हंगाम आणखी महिनाभर चालणार आहे. तथापि, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचे वर्ष हे पठार पर्यटकांसाठी ‘लॉकडाऊन’च राहणार आहे. दरवर्षी दीड महिन्याच्या काळात दोन लाख पर्यटक येथे येतात. यंदा ही वर्दळ नसल्याने येथील जैवविविधता फुलली आहे.कास पठारावरील फुलांचा मोसम बहरात आहे. १ सप्टेंबरला कासचा पर्यटन हंगाम सुरू होतो. तथापि, कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा हंगाम सुरू करण्याला लाल निशाण दाखवले आहे. त्यामुळे कास कार्यकारी समितीने पठारावरील पर्यटकांचे मार्ग बंदच ठेवले. पठारावरील पायवाटा व कुमोदिनी तळ्याकडे जाणारा राजमार्गही बंद ठेवला आहे.पर्यावरणासाठी सुनियंत्रित पर्यटनाची गरजभविष्यात प्रदूषण न करणाऱ्या, अपारंपरिक ऊर्जेवरील वाहनांचा वापर पठार व परिसरात करावा किंवा येणाºया पर्यटकांची वाहने साताºयात थांबवून बसने पठारावर लोकांना नेता येईल. तेथे पायी किंवा सायकलचा वापर वाढवता येईल.पर्यटकांचे लोंढे थांबवायचे याचा अर्थ पर्यटन बंद नव्हे, तर नियंत्रित पर्यटन असा आहे. पठाराच्या धारण क्षमतेएवढेच पर्यटकांना पठारावर सोडता येईल.अशा उपायांमुळे लॉकडाऊन काळात खुललेली पठाराची जैवविविधता पुढे दरवर्षी कायम राखता येईल, असे आग्रही मत तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले.

पर्यटकांना दुरूनच दर्शनगेल्या ६ महिन्यांत लॉकडाऊनला कंटाळलेले पर्यटक पठारावर तुरळक प्रमाणात, ‘वीकेंड’ला येत आहेत. मुख्य रस्त्यावरून, दुरूनच फुलांचे दर्शन घेऊन परतावे लागत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगावहून कासला फिरायला आलेले रमेश बनसोडे म्हणाले, येथे निसर्गाची मुक्त उधळण आहे. त्यामुळे एवढ्या लांबून मित्रांसोबत आलो. पठारावर वातावरणही चांगले आहे; परंतु पर्यटकांना प्रवेश बंद असल्याने आम्हाला रस्त्यावरून परत जावे लागत असल्याने आमचा भ्रमनिरास झाला.

कासचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी सांगितले की, निळ्या-पांढºया रंगाची सीतेची आसवं, पांढºया रंगाची गेंद, तुतारी, चवर (रानहळद), गवती दवबिंदू, नीलिमा, अबोली, सोनकी, महाकाली, आभाळी, नभाळी आदी ३० ते ३५ प्रकारची फुले पाहायला मिळत आहेत.निळी मोठी सोनकी (अ‍ॅडेनून) हे फूल पठारावर फुलल्यानंतर फुलांचा हंगाम ७० टक्केसंपल्याचे स्थानिक लोक मानतात.अद्याप हे फूल पठारावर दृष्टीस पडले नाही. त्यामुळे फुलांचा हंगाम आणखी महिनाभर चालेल, असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Kas Patharकास पठार