शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

कारची ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक, ५ वर्षाच्या मुलासह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 13:59 IST

: सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामूळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

ठळक मुद्देकारची ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक, ५ वर्षाच्या मुलासह तिघे जखमी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मलकापूर : सातारा येथून कोल्हापूरकडे जात असलेल्या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कराड दिशेने निघालेल्या ट्रँक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकासह तिघे जखमी झाले. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच असल्यामूळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.योगेश अशोक बारटक्के ( वय ३५), भारती अशोक बारटक्के (वय ५५ ), निरज योगेश बारटक्के (वय ५ सर्व रा. मंगळवार पेठ सातारा) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.अपघातस्थळावरून व पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ट्रँक्टर (क्रमांक एम एच ११ यु ०८२३ ) हा ट्रॉली क्रमांक ( एम एच ११ आर ९६५३ व ९६५४) घेऊन कराडकडे जात होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत आले असता, सातारा येथून कोल्हापूर दिशेने जात असलेल्या कार ( क्रमांक एम एच १२ ई टी ३४३७) च्या चालकाचा ट्रँक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटल्याने कारची ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसली.

या अपघातात चालकासह कारमधील बारटक्के कुटुंबातील तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, सिकंदर उघडे, यांच्यासह महामार्ग पोलिस कर्मचारी व कराड शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रशांत जाधव, खलील इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अपघातातील जखमींना १०८ रूग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात पाठवून दिले. यावेळी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरच आसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक कांही काळ उपमार्गावरून वळवण्यात आली होती. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमीला रूग्णालयात पाठवल्यानंतर महामार्ग देभालचे व महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहने बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केला. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरKaradकराड