कऱ्हाडचा ‘रोबोटिक आर्म वन’ प्रथम
By Admin | Updated: December 16, 2014 00:14 IST2014-12-15T22:22:43+5:302014-12-16T00:14:44+5:30
एबीआयटी विज्ञान प्रदर्शन : बक्षीस समारंभ उत्साहात ; १४७ शाळांचा सहभाग

कऱ्हाडचा ‘रोबोटिक आर्म वन’ प्रथम
सातारा : विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या शेंद्रे येथील अभयसिंंहराजे भोसले इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कऱ्हाडच्या शिवाजी विद्यालयाच्या ह्षीकेश अनिल पाटील या विद्यार्थ्याने तयार केलेले ‘रोबोटिक आर्म वन’ या उपकरणाने प्रथम क्रमांक पटकविला. या प्रदर्शनात सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलच्या शुभंकर शिंदे आणि श्रेयस पाटोळे या विद्यार्थ्यांच्या ‘केरोसिन रेशनिंंग एटीएम’ याला द्वितीय, तर भवानी विद्यामंदिर शाळेतील शशिकांत शिंदे याच्या ‘प्रकाशाचे नियम’ या उपकरणाला तृतीय क्रमांम मिळाला.
या प्रदर्शनात जिल्हाभरातून १४७ शाळांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रामचंद्र जगदाळे, संचालक चंद्रकांत जाधव, राजाराम जाधव, माजी संचालक अशोक मोरे, प्रशासकीय अधिकारी फडतरे, ए. के. देसाई, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, अरुण चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रदर्शनातील प्रथम क्रमांकाला दहा हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला सात हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला पाच हजार व सन्मानचिन्ह, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाला प्रत्येकी पंधराशे रुपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात आले.
या प्रदर्शनात पवार विद्यालय, कालवडे येथील हर्षदा थोरात आणि श्वेता पाटील यांच्या ‘ऊर्जा वापर’ यंत्राला चतुर्थ, सातारा येथील महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या प्रणव कदम आणि साहिल शिंगटे यांच्या ‘पॉकेट टँक डिलक्स’ या उपकरणाला पाचवा, तर कऱ्हाडच्या के.सी.टी.एस. कृष्णा स्कूलच्या जयंत पाटील व गौरव हजारे यांच्या ‘अॅटोमेटिक रेन गेज’ या उपकरणाने सहावा क्रमांक पटकाविला.
प्रा. डी. एस. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. डी. नलावडे यांनी प्रास्ताविक केले. अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य आनंदा घोलप यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
उत्तेजनार्थ बक्षिसेही...
प्रदर्शनात आदर्की बु. येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रगती अनपट आणि प्रज्ञान काकडे यांच्या ‘संदेशवहन’, आकोशी येथील केदारेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या अक्षदा बंगे व पूजा कांबळे यांच्या ‘स्पिंग मेकिंग’, महाबळेश्वर येथील सेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या गणेश सोनवलकरच्या ‘शेतकरी मित्र’, तर सातारा येथील आयरन अॅकॅडमी स्कूलच्या अमेय चिटणीस आणि पार्थ शास्त्री या विद्यार्थ्यांच्या ‘जीएसएम टू जीएसएम कन्ट्रोल्ड रोबोटिक कार’ या उपकरणाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.