शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची दुचाकीला पाठिमागून धडक, सुट्टीसाठी गावी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 12:05 IST

पुणे-बंगळूर महामार्गावर जखिणवाडी फाटा येथे अपघात

माणिक डोंगरेमलकापूर : भरधाव कारची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील सुट्टीवर आलेला सैन्यदलातील जवान ठार झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील मळाईदेवी पतसंस्थेसमोर आज, बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नितीन मोहन शेवाळे (वय २१ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या सैन्यदलातील जवानाचे नाव आहे. तर प्रथमेश दिपक शेवाळे (१९ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शेवाळे हे भारतीय सैन्यदलात सेवा बजावत होते. ते सुट्टीसाठी गावी शेवाळेवाडी येथे आले होते. त्याच्या चुलत भावाला रुग्णालयात बघण्यासाठी ते दुचाकी (क्रमांक एम एच ५० एफ ३८८०) वरून रूग्णालयात येत होते. पुणे-बंगळूर महामार्गावर मळाईदेवी पतसंस्थेसमोर त्याच्या दुचाकीला पाठिमागून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कार (क्रमांक एम एच १२ सी के १२३९) ची जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही महामार्गावरच फरपटत गेले. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिक व युवक अपघातस्थळी धावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग डी पी जैन विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा यांनी कराड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खलील ईनामदार व प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी व महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दखल झाले. जखमींना रूग्णवाहिकेने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र जवान नितीन शेवाळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी युवकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जवान शेवाळे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण शेवाळेवाडी गावावर शोककळा पसरली. कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ए ए ईनामदार व प्रशांत जाधव यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू