सातारा - खंबाटकी घाट उतरतना चारचाकी गाडीने महामार्गावरच अचानक पेट घेतला. यात चारचाकी गाडी पूर्णत: जळून खाक झाली. यावेळी घाटातून येणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, चारचाकी वाहन क्रमांक MH11CH1888 ही गाडी खंबाटकी घाट चढून उतरत असताना या गाडीने महामार्गावरच अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किटमुळे किंवा घाट चढताना गाडी खूप गरम झाल्यामुळे या गाडीने पेट घेतला असण्याची शक्यता आहे. संबंधित गाडी ही पाचगणी येथील असल्याची समजते. या गाडीमध्ये फक्त चालक प्रवास करीत होता. त्याला मात्र कोणतीही इजा झाली नाही.