शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

By सचिन काकडे | Updated: April 12, 2024 19:18 IST

उमेदवारांकडून पायाला भिंगरी : गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अनेकांनी शड्डू ठोकला असून, इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघामध्ये गाठीभेटींचा धडाका सुरू करण्यात आला आहे. सध्या तरी दिग्गजांनी कऱ्हाड दक्षिण, उत्तर व पाटण मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून, मतांची गोळाबेरीजही सुरू केली आहे.एप्रिल-मे २०१९ मध्ये झालेल्या सातारा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना पराभूत केले होते. अवघ्या पाच महिन्यांतच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. शरद पवार यांनी आपले निष्ठावंत शिलेदार श्रीनिवास पाटील यांना लोकसभेच्या आखाड्यात उभे केले. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत खासदार उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला.या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना ६ लाख ३७ हजार ६२०, तर उदयनराजे भोसले यांना ५ लाख ४८ हजार ९०३ मते मिळाली. श्रीनिवास पाटील यांना कऱ्हाड, पाटण तालुक्यातून ३ लाख ४० हजार ५३९, तर उदयनराजे यांना २ लाख २९ हजार ९५२ मते मिळाली. श्रीनिवास पाटील यांनी कऱ्हाड दक्षिण, उत्तर व पाटण मतदारसंघातून तब्बल १ लाख १० हजार ५८७ इतके मताधिक्य मिळवले होते. सातारा मतदारसंघ हा उदयनराजेंचा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघात त्यांना १ लाख १८ हजार ८९८, तर श्रीनिवास पाटील यांनी ७२ हजार ८४७ मते मिळाली.सद्य:स्थिती पाहता कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर व पाटण या मतदारसंघांतील मतदारांची संख्या ८ लाख ९४ हजार ७९९ इतकी आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकणाऱ्या उमेदवारांकडून प्रामुख्याने या तीन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गाठीभेटी, बैठका, सभा तसेच छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना नेतेमंडळी हजेरी लावून मतांची गोळाबेरीज करू पाहत आहे.

जिथून पिछेहाट तिथूनच प्रारंभ..२०१९ च्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी कराड दक्षिण, उत्तर व पाटण या तीन मतदारसंघांतून मोठे मताधिक्य मिळविले होते. या मताधिक्यामुळेच खासदार उदयनराजे भोसले यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. २०२४ ची निवडणूक श्रीनिवास पाटील लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या जागी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकीत घटलेले मताधिक्य भरून काढण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी डावपेच आखले असून या तीन मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे