कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, कृती समितीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:47 IST2019-08-30T13:46:23+5:302019-08-30T13:47:55+5:30
कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, अशा घोषणा देत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरूवात केली. कोणत्याही परिस्थितीत विमानतळ विस्तारवाढ होऊ देणार नाही. आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत, अशा घोषणा यावेळी मोर्चातील सहभागी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, कृती समितीचा मोर्चा
कऱ्हाड : कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ रद्द करा, अशा घोषणा देत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास सुरूवात केली. कोणत्याही परिस्थितीत विमानतळ विस्तारवाढ होऊ देणार नाही. आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत, अशा घोषणा यावेळी मोर्चातील सहभागी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
मुंढे, ता. कऱ्हाड येथून निघालेल्या या मोर्चात सुमारे दोनशेहून अधिक बाधित शेतकरी, ग्रामस्थ तसेच श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या आहेत. यावेळी कृती समितीचे सचिव जयसिंग गावडे, आनंदराव जमाले, पंजाबराव पाटील, भास्करराव पाटील, संजय कदम, गोविंदराव शिंदे, संभाजी साळवे, संदीप पाटील, जनार्दन पाटील, सर्जेराव पाटील, वसंतराव धुमाळ, कैलास साळवे, शिवाजी शिंदे, रवींद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती आहे.
कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ विरोधी शेतकरी व भैरवनाथ पाणी पुरवठा बचाव कृती समितीतर्फे काढलेल्या या मोर्चात मुंढे, वारुंजी, केसे, पाडळी, गोटे येथील बाधित शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.