शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अटी न लावता सोयाबीन खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:07 PM

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या ...

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेच्या वतीने शेती उत्त्पन्न बाजार समितीतील खरेदी केंद्रावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्यात आले. या हल्लाबोलनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. या निवेदनात संदीप मोझर यांनी म्हटले आहे की, सध्या मूग, घेवडा, उडीद आदी कडधान्यांसह सोयाबीन उत्पादक शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. वास्तविक सोयाबीन पीक घेताना शेतकºयांना खूप झगडावे लागते. त्यातच शासकीय खरेदी केंद्रांवर एकरी ८ क्विंटल सोयाबीन घेऊ, असा शासनाचा नियम आहे. जर एकरी ८ क्विंटल सोयाबीन शासकीय केंद्रावर दिले तर उरलेल्या सोयाबीन पिकाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे.सोयाबीन व अन्य कोणत्याही पिकांची नोंद स्वत: शेतकरी तलाठी कार्यालयात जाऊन करत नाही. तलाठी चावडीत बसून त्यांच्या मनाने व उपलब्ध तुटपुंंज्या माहितीनुसार पिकाची नोंद पिकवारीत करतात. आपल्या पिकाची नोंद करण्याइतकी समज अल्पशिक्षित शेतकºयांना नसते. त्यामुळे त्रूटी राहून शेतकºयांचा तोटाच होतो. याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी व केवळ पिकपाण्याची नोंद नसल्याने होत नसलेल्या खरेदीबाबत होणारे शेतकºयांचे नुकसान टाळावे, अशी आमची मागणी आहे.दहा दिवसांत शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत ठोस निर्णय न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करू. आंदोलनादरम्यान होणाºया परिणामास आणि नुकसानीस शासनच जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा इशारा मोझर यांनी दिला.आंदोलनात संदीप मोझर यांच्यासह महाराष्टÑ नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सचिन पवार, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार, शेतकरी सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष दिलीप सुर्वे, वाई तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पिसाळ, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.नऊ दिवसांत ३४ क्विंटल खरेदीसाताºयात १६ आॅक्टोबरपासून सुरूझालेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर अवघ्या नऊ दिवसांत ३४ क्विंंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेता शासनाने जाहीर केलेल्या ३०५० दरापेक्षा ४०० रुपयांनी कमी दर व्यापारी देत आहेत. असे असूनही एका मिनिटांत ३४ क्विंटलची होत असलेली खरेदी पाहता शासन व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचेच सिद्ध होते, असा आरोपही यावेळी मोझर यांनी केला.कर्जमाफीप्रमाणेच फसवा अजेंडासरकारी केंद्राकडे जाताना सर्वप्रथम तलाठ्याचे खिसे गरम करावे लागतात. तेथून मिळेल त्या वाहनातून खरेदी केंद्रावर सोयाबीन नेल्यावर कागदपत्रे पाहून त्याची प्रतवारी तपासताना शेतकºयास अक्षरश: रडकुंडीला आणले जाते. तेथे प्रतवारीत न बसल्याने नाकारलेले सोयाबीन नाईलाजाने लगतच्याच व्यापाºयास प्रती क्विंंटल ४०० रुपयांचा तोटा सहन करून घालावे लागते. कर्जमाफीप्रमाणेच सोयाबीन खरेदी केंद्र हा सुद्धा शासनाचा फसवा अजेंडा आहे, अशी टीकाही यावेळी संदीप मोझर यांनी केली.

टॅग्स :agricultureशेती