शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

नदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली, २५ प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 2:41 PM

ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नदीत कोसळणारी बस चक्क झाडावर धडकवून २५ प्रवाशांचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील रेल्वे पुलानजीक घडली. वेगात असलेली बस झाडावर धडकल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देनदीत कोसळणारी बस चालकाने झाडावर धडकवली२५ प्रवाशांचे वाचले प्राण : कोरेगाव रेल्वेपुलानजीक घटना

सातारा : ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने नदीत कोसळणारी बस चक्क झाडावर धडकवून २५ प्रवाशांचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील रेल्वे पुलानजीक घडली. वेगात असलेली बस झाडावर धडकल्याने सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, दहिवडीहून साताऱ्याला एसटी येत होती. कोरेगाव रेल्वेपुलानजीक बस आल्यानंतर अचानक एसटीचा ब्रेक निकामी झाला. त्यावेळी पुढे नदीचे विस्तीर्ण पात्र होते. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्याकडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर धडकवली.

एसटीचा वेग जास्त असल्यामुळे बस झाडावर जोरदार धडकल्याने आतील प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यामुळे अनेकांची डोकी फुटली तर काहींच्या हाताला, छातीला मुका मार लागला. या अपघातानंतर सर्व प्रवाशांना एसटीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.चालकाने एसटी झाडावर धडकवली नसती तर, या विचारानेच प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने २५ प्रवाशांचे प्राण वाचले. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. पुढे काही अंतरावर नदी दिसत होती. हे चित्र आपल्या मोबाईलमध्ये अनेकजण टिपत होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर