आगीत उसासह जलवाहिन्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST2021-02-12T04:37:01+5:302021-02-12T04:37:01+5:30

वाठार निंबाळकर : विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने लागलेल्या आगीत कुरवली खुर्द, ता. फलटण येथील अर्धा एकर ऊस व पाण्यासाठी ...

Burn the waterways with sugarcane in the fire | आगीत उसासह जलवाहिन्या जळून खाक

आगीत उसासह जलवाहिन्या जळून खाक

वाठार निंबाळकर : विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने लागलेल्या आगीत कुरवली खुर्द, ता. फलटण येथील अर्धा एकर ऊस व पाण्यासाठी असणाऱ्या पाईप जळून खाक झाल्या आहेत.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी, कुरवली खुर्द येथील नूतन मण्यासाहेब निंबाळकर यांच्या मालकीच्या शेतीमधील तोडणी योग्य असलेल्या उसाला शेतीमधून गेलेल्या विजेच्या खांबावरील तारा एकमेकांना घासून आग लागली. या आगीत ऊस संपूर्ण जळून खाक झाला, तर पाण्यासाठी वापरत असणाऱ्या चार इंची पीव्हीसी सहा पाईप जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी प्रकाश फडतरे यांनी घटनास्थळी केला आहे, तर वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता एम. यु. ढेबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेत नूतन निंबाळकर यांचे अंदाजे ऐंशी हजार रुपये रकमेचे नुकसान झाले असल्याची माहिती तलाठी प्रकाश फडतरे यांनी दिली.

Web Title: Burn the waterways with sugarcane in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.