शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:21 IST

लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ठळक मुद्देडाळिंबाची ९०० झाडांची बाग जळून खाकक्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

लोणंद : लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दर नसल्याने डबघाईला आलेल्या शेतकऱ्याच्या मागील संकट काही कमी होताना दिसत नाही. कोरोनामुळे शेतकऱ्यावर मोठे संकटच उभे राहिले आहे. शेतमालाला भाव नसताना शेतकरी मोठ्या हिमतीने शेतीमध्ये नवनवे प्रयोग करताना दिसत आहे. मात्र, त्याला निसर्गाची व शासनाची साथ मिळताना दिसत नाही. त्यातच तेल्या व मर यासारख्या रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत.

या संकटांमुळे शेतकाऱ्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. मात्र, हार न मानता क्षीरसागर कुटुंबाने मोठ्या कष्टाने डाळिंबाची बाग उभी केली. कमी पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळाला आलेल्या बागेसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले होते. संपूर्ण बागेतील ९०० झाडांना ठिबक सिंचनची सोय केली होती.

मोठ्या डौलाने उभी राहिलेल्या या बागेला मात्र दि. २६ रोजी रात्री अचानक आग लागली. आग कशी लागली का कोणी लावली, याचे कारण जरी समजू शकले नाही. तरी एका रात्रीत या डाळिबांच्या बागेची राख होताना पाहण्याचे दुर्भाग्य या कुटुंबावर आले.

यामध्ये संपूर्ण ड्रीपच्या पाईप जळून खाक झाल्या मोठ्या कष्टाने उभी केलेली डाळिंबाची बाग काही क्षणात जळून खाक झाल्याने क्षीरसागर कुटुंबीयांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. बागेचा पंचनामा संबंधित विभागाने केला आहे. तरी लवकरात लवकर या कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी क्षीरसागर कुटुंबीय करीत आहेत.दोन कोट व चौकट येणार आहे. 

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर