शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

सातारकरांच्या पाठीवर सॅकचे ओझे, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 2:23 PM

हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे.

ठळक मुद्दे सातारकरांच्या पाठीवर सॅकचे ओझे, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच वापरशास्त्रोक्त पद्धतीने बॅगचा वापर होत नसल्याने वाढतायत आरोग्य समस्या

सातारा : हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागले आहे.काही वर्षांपूर्वी महाविद्यालयाची पायरी चढल्यानंतरच सॅक पाठीवर यायची. आता अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवरही सॅक आली आहे, त्यामुळे पारंपरिक दप्तर आता अडगळीत आणि आऊट आॅफ फ ॅशन झाले आहे. इंग्रजांची फॅशन म्हणून आपल्याकडे आलेल्या सॅकच्या भारतीय अवतारामुळे पाठीचे आजार वाढू लागले आहेत. या आजार आणि व्याधींना सातारकरही अपवाद नाहीत, हे खेदाने म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सॅक वापरायची असेल तर त्याची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन वापर करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.काय आहे योग्य पद्धत?पाठीवर सॅक असेल तर त्याचा पूर्ण भार मणक्यावर येतो. काहीजण सॅक कमरेपर्यंत टांगती पाठीवर अडकवतात. यामुळे पाठीच्या मणक्यावर सर्वाधिक ताण पडतो. त्यामुळे सॅक पाठीवर ठेवताना ती लोंबकळती ठेवायची नाही. पाठीवर फिट्ट सॅक बसली तर सामानाचे ओझे दोन्ही खांद्यावर विभागले जाते, त्यामुळे मणक्यावर ताण पडत नाही.किती सामान बसते?मध्यम आकाराच्या सॅकमध्ये साधारण दोन दिवसांच्या प्रवासाचे कपडे बसू शकतात. विविध कप्पे असल्यामुळे अन्य सामान बसवणेही सोपे शक्य होते. पाण्याची बाटलीही साईडच्या कप्प्यात ठेवता येत असल्याने त्याला अधिक प्राधान्य दिले जाते.हे आहेत सॅक वापरणारे...!

  • शाळेतील मुलं
  • महाविद्यालयीन युवा
  • मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह
  • कुरिअर बॉय
  • फिरती नोकरी करणारे
  • गाडीवर प्रवास करणारे
  • प्रवासाला जाणारे
  • मालाचा पुरवठा करणारे

हे नक्की कराच!

  • आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांना व्यायामासाठी विशेष वेळ नाही काढता आला तरी काही विशिष्ट हालचाली केल्यामुळे पाठीच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.
  • खूप वेळ एकाच जागेवर बसू नका.
  • विशिष्ट वेळेनंतर जागा आणि बसण्याची पद्धत बदला.
  • हात वर करून ताडासन करण्याचा प्रयत्न करा.
  • ताण देऊन दोन्ही खांदे मागे ओढा शक्य असेल तेव्हा खांदे मागे-पुढे असे हलवा.
  • बसल्या ठिकाणी हात मागे घेऊन पाठ ताठ करण्याचा प्रयत्न करा. 

सॅकला पर्याय?शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी दप्तर हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. महाविद्यालयात जाणाऱ्यांसाठी स्लिंग बॅग हा उत्तम पर्याय आहे. नोकरीसाठी जाणाऱ्यांना अडकविण्याची बंद असलेली हँडबॅग उत्तम पर्याय आहे.वाढती क्रेझ कशासाठीबाजारात सध्या सर्व आकार, रंग आणि प्रकारात सॅक उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, दोनशे रुपयांपासून सॅक मिळू शकते. स्थानिक ठिकाणीही सॅक तयार करणारे असल्याने त्याच्या किमती कमी आहेत. पर्यायाने उपलब्धता आणि वैविधता असल्यामुळे सर्वच वयोगटात सॅकचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत दिवेसंदिवस वाढ होत आहे.होणारे परिणामपाठीवर सॅक अडकवल्याने त्याचा सर्वाधिक ताण मणक्यावर पडतो. त्यामुळे मणक्यातील मज्जारज्जूंवर परिणाम होतो, यामुळे मणक्याचे काही आजारही उद्भवतात.बालक : मणका पूर्ण तयार होत असताना त्याच्यावर पडलेल्या ताणामुळे पाठीला बाक येण्याची शक्यता असते. मात्र, वाढत्या वयात ते भरून निघण्याची शक्यता अधिक असते. एकाग्रतेची कमतरता, पाठ दुखणे, थकणे यांसारखे त्रास संभवतात.युवा : चुकीच्या बसण्याच्या पद्धती, एकाच जागेवर बसून राहणे, मोबाईलमुळे सारखी मान खाली घालून बसणे, व्यायामाचा अभाव यामुळे युवांना पाठीचा त्रास जाणवतो. शरीराला आवश्यक प्रथिनांच्या कमतरतेमुळेही पाठीचा त्रास वाढतो.मध्यमवयीन : गाडी चालवताना रस्त्यावर असलेले खड्डे आणि त्याच्या जोडीला पाठीवर असलेली सॅक अनेक त्रासांचे कारण बनू शकते. कायम फिरते काम असेल तर पाठदुखीच्या आणि पाठीच्या कण्याचा त्रास संभवण्याची शक्यता असते.महाविद्यालयीन युवांचे हालशहरात येणाऱ्या अनेक महाविद्यालयीन युवांना रोज काही तासांचा प्रवास करावा लागतो. सकाळी एसटीने प्रवास, त्यानंतर महाविद्यालयापर्यंत चालत जाणे. महाविद्यालय संपल्यानंतर क्लासपर्यंतची पायपीट आणि पुढे एसटीची वाट पाहण्यासाठी होणारी ताटखळ यामुळे या मुलांना सर्वाधिक वेळ जड सॅक आपल्या पाठीवरच ठेवावी लागते. यासाठी त्यांना शक्य असेल तेव्हा सॅक पाठीवरून काढून ठेवण्याची सवय लावणे गरजेचे आहे.युवतींना त्रास अधिकमहाविद्यालय आणि नोकरीसाठी जाणाऱ्या युवती ज्या सॅकचा वापर करतात, त्यांना त्याचा सर्वाधिक त्रास जाणवतो. बऱ्याचदा मुली सॅक एकाच खांद्यावर अडकवतात, त्यामुळे खांद्याचे आजार उद्भवतात. दुसरीकडे सॅकमध्ये बसेल तेवढे सगळे सामान भरण्याकडे त्यांचा कल असतो, त्यामुळे सॅकचे ओझेही वाढलेले असते. योग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि बसण्याच्या अयोग्य सवयींमुळे पाठीच्या कण्याचा त्रास युवतींना जाणवतो.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSatara areaसातारा परिसर