कऱ्हाड : येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी. बुराडे आणि प्रा.डाॅ.एम.एस. चरडे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, त्यांना आंतरराज्य शिक्षणसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आला.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांतून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कऱ्हाड येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयचे प्राचार्य डाॅ.के.बी. बुराडे आणि प्रा.डॉ.एम.एस. चरडे यांना यंदाचा हा पुरस्कार बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, अरविंद गट्टी, उद्योजक सुरेश पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.