शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पूर मानवनिर्मित, पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत : श्रीमंत कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:21 IST

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देपूर मानवनिर्मित असल्याचा कोकाटे यांचा आरोपपूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी

सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.कोकाटे म्हणाले, या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूरामुळे माणसे, जनावरे, घरे, शेती व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील अनेक घरे पडलेली आहेत. ज्या घरात पाणी गेले आहे, ती घरे जीवितास धोकादायक आहेत, त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत, ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते, या शेतीचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. शासनाने सरसकट शेतकरी व शेतमजूर यांना नुकसान भरपाई द्यावी. पशुधन ही ग्रामीण भागातील समांतर अर्थव्यवस्था आहे. अनेक जनावरे दगावली आहेत, वाचलेल्या जनावारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, गणवेश मोफत द्यावेत.हा पूर मानवनिर्मित असल्याचा आरोप करुन कोकाटे पुढे म्हणाले, कर्नाटक सरकार बनाव करत आहे. अलमट्टी धरण हे १२३ टीएमसीचे नसून २२३ टीएमसीचे आहे. कृष्णेचे अतिरिक्त पाणी कऱ्हाड  येथून उचलून सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबादमधील दुष्काळी गावांना देण्यासाठी शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून निर्णय घ्यावा.यावेळी निसार मुल्ला, अमोल संकपाळ, राहुल बर्गे, प्रशांत यादव, प्रमोद काटे, सुनील भोसले, सूर्यकांत चव्हाण, सत्यजित सानप, राजन सूर्यवंशी, ज्योतिराम यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर