शहरं
Join us  
Trending Stories
1
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
2
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
3
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
4
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
5
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
6
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
7
BBM6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
8
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
9
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
10
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
11
अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
12
'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
13
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
14
आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
15
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
16
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
17
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
18
'विराट' दूरावा संपला! ज्या गोष्टीपासून लांब राहिला, तिकडे पुन्हा वळला किंग कोहली; ‘यू टर्न’ चर्चेत
19
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
20
ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शिकारीचा बनाव रचून फलटणमध्ये निर्घृण खून, पोलिसांनी चार तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:45 IST

फलटण (जि.सातारा) : सस्तेवाडी (ता. फलटण) येथील लोंढेवस्ती परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीची सशाच्या शिकारीच्या बहाण्याने बोलावून निर्घृण हत्या ...

फलटण (जि.सातारा) : सस्तेवाडी (ता. फलटण) येथील लोंढेवस्ती परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीची सशाच्या शिकारीच्या बहाण्याने बोलावून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश बाळू मदने, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत तपासाची चक्रे फिरवून दोन संशयित आरोपींना अटक केली.ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री ११ ते १:४० वाजेच्या सुमारास घडली. रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (२२, रा. सोमवार पेठ, फलटण, मूळ रा. कलिना, मुंबई), अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.सस्तेवाडी-फलटण रस्त्यावर गणेश मदने रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला हा रस्ते अपघात असावा, असे भासवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या. मदने यांची दुचाकी स्टँडवर व्यवस्थित उभी होती. दुचाकीच्या स्वीचला चावी तशीच होती. अपघाताच्या खुणा नसतानाही मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती. पोलिसांनी ही विसंगती ओळखून तत्काळ नातेवाइकांकडे चौकशी केली.काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींशी गणेश मदने यांचे भांडण झाल्याची माहिती समोर आली आणि तपासाची दिशा बदलली. निर्जनस्थळी आणि मध्यरात्री ही घटना घडल्याने पुराव्यांचा अभाव होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आरोपींचा माग काढला. संशयित आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Hunting ruse leads to brutal murder; accused arrested.

Web Summary : A 40-year-old man was murdered near Satara under the guise of hunting rabbits. Police swiftly arrested two suspects within four hours after discovering inconsistencies at the scene, revealing it was not an accident. The victim had argued with the suspects before his death.