बहिणीची छेड काढली म्हणून भावाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:37 IST2020-07-22T23:34:04+5:302020-07-22T23:37:00+5:30

बहिणीला सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून वडूथ, ता. सातारा येथे दोघांनी मंगळवारी रात्री एकाचा धारदार कुºहाड आणि फरशीने वार करून निर्घृण खून केला. या हल्ल्यात मृताचा पाय तोडला गेल्याने सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.

Brother murdered after molesting sister | बहिणीची छेड काढली म्हणून भावाने केला खून

बहिणीची छेड काढली म्हणून भावाने केला खून

ठळक मुद्देबहिणीची छेड काढली म्हणून भावाने केला खूनपोलीसानी दिली घटनास्थळी भेट

सातारा : बहिणीला सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून वडूथ, ता. सातारा येथे दोघांनी मंगळवारी रात्री एकाचा धारदार कुºहाड आणि फरशीने वार करून निर्घृण खून केला. या हल्ल्यात मृताचा पाय तोडला गेल्याने सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.

सचिन विठ्ठल पवार (वय ३०, रा. वडूथ, ता. सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रणजित नंदकुमार साबळे आणि अमित दत्तात्रय साबळे (दोघे रा. वडूथ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, बहिणीला सचिन पवार सारखा त्रास द्यायचा व तिच्या मुलीसही मारहाण करतो, यावरून दोन्ही संशयित चिडून होते. तसेच त्यांच्या बहिणीची छेडछाडही झाली होती.

या रागातून मंगळवारी सचिन पवार घरासमोर असताना त्याच्यावर दोघांनी कुºहाड व फरशीने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन पवार गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच सातारा तालुका पोलीस यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

 

Web Title: Brother murdered after molesting sister