शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

इतिहासाला झळाळी : पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:00 IST

Archaeological Survey of India satara-पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोन्याची नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून, पुरातत्वकडून या नाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

ठळक मुद्देइतिहासाला झळाळी : पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात मौल्यवान नाण्यांचे पुरातत्त्व विभाग करणार संवर्धन

सचिन काकडेसातारा : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोन्याची नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून, पुरातत्वकडून या नाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.पुण्यातील पिंपरी-चिंचवडजवळील चिखली येथे काही महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी खोदकाम करत असताना तांब्याचा चरवीच्या आकाराचा मोठा गढवा (भांडे) सापडला होता. या गढव्यात सोन्याची तब्बल २१६ नाणी सापडली असून, त्यांचे वजन २ हजार ३५७ ग्रॅम इतके आहे. या नाण्यांच्या वाटपावरून सुरू झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सर्व नाणी ताब्यात घेऊन ती पुरातत्वकडे हस्तांतरित केली.ही नाणी सिराजउद्दीन मोहम्मद शहा बहादूर दुसरा याच्या काळातील व १८३५ ते १८८० या कालखंडातील असावीत, असा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे. पुणे, मुंबई व नजीकच्या शहरांत शासकीय वस्तुसंग्रहालय नसल्याने पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी साताऱ्यातील संग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सोन्याची २१६ नाणी व तांब्याचा गडवा सुपूर्द केला. यावेळी संग्रहालयाचे कर्मचारी गणेश पवार, अजित पवार, कुमार पवार, विनोद मतकर, देवदान भांबळ आदी उपस्थित होते.साठ वर्षांनंतर सुवर्णयोगउत्खननात अथवा बांधकामावेळी आढळलेली काही नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात यापूर्वी जमा करण्यात आली आहेत. दहा वर्षांपूर्वी कोयनेत तांब्याची ५०० नाणी आढळली होती तर गेल्याच वर्षी इंदापूर येथे चांदीची ७५ नाणी सापडली होती. ही नाणीही सातारा येथील संग्रहालयात जमा करण्यात आली आहेत. मात्र, सोन्याची नाणी इतक्या मोठ्या संख्येने संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्याची ही गेल्या ५१ वर्षांतील पहिलीच वेळ आहे.

  • सोन्याची नाणी २१६
  • नाण्यांचे वजन २,३५७ ग्रॅम
  • तांब्याचा गडवा ५२६ ग्रॅम
  • नाण्यांचा कालखंड १८३५ ते १८८०

पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी नुकतीच सातारा संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. ही नाणी पुरातन आणि मौल्यवान असून, त्यांचे संवर्धन केले जाईल. जुन्या संग्रहालयाची जागा वस्तूंसाठी अपुरी पडू लागल्याने हजेरी माळावर नवे संग्रहालय उभारले जात आहे. सध्या संग्रहालयाच्या इमारतीचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जात आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर हे संग्रहालय सातारकरांच्या सेवेत लवकरात लवकर दाखल होईल, अशी आशा आहे.- प्रवीण शिंदे, अभिरक्षकछत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणSatara areaसातारा परिसर