शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दारूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच, उत्पादन शुल्कच्या जवानासह एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:26 IST

सातारा : दारू विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड विभागातील उत्पादन शुल्कचा जवान भीमराव शंकर माळी ...

सातारा : दारू विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड विभागातील उत्पादन शुल्कचा जवान भीमराव शंकर माळी (वय ३७, रा. मलकापूर कऱ्हाड) व खासगी व्यक्ती मुस्तफा मोहिदिन मणियार (वय २५, रा. मलकापूर, लक्ष्मीनगर, ता. कऱ्हाड) यांना सांगली येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि. ५ रोजी सायंकाळी कऱ्हाड येथे करण्यात आली.तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये कऱ्हाड विभागाच्या उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांनी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी करवाई केली होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व पुन्हा दारू विक्रीचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे जवान भीमराव माळी याने ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपतच्या कार्यालयात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. त्यानंतर सांगलीतील एसीबीच्या पथकाने शहानिशा केली असता जवान भिमराव माळी हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सांगली एसीबीच्या पथकाने बुधवारी कऱ्हाड येथे सापळा लावला. त्यावेळी माळी याने खासगी व्यक्ती मुस्तफा मणियार याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी मणियार याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई सांगली लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलिस काॅन्स्टेबल ऋषीकेश बडणीकर, प्रीतम चाैगुले, सुदर्शन पाटील, विठ्ठल रजपूत यांनी केली. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सातारा लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन राऊत हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी