सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील कठड्यांनाही भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:54 IST2017-11-20T17:48:28+5:302017-11-20T17:54:11+5:30
सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक तसेच वाहनधारकांमधून होत आहे.

सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे.
पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक तसेच वाहनधारकांमधून होत आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेस कास, बामणोली ही जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. पर्यटकांना या ठिकाणी जाण्यासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. पावसाळा वगळता पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच रेलचेल सुरू असते.
सुमारे एक महिन्यापूर्वी घाटरस्ता खचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याचे काम सुरू झाले असताना आता संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.
घाटातील ठिकठिकाणचे कठडे तुटले असून, काही ठिकाणच्या कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने याचा वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. घाटातील धोकादायक ठिकाणांची, नादुरुस्त कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक तसेच पर्यटकांमधून होत आहे.