शैक्षणिक शुल्कला शासनाने आडकाठी केल्यास ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:09+5:302021-06-26T04:26:09+5:30

मलकापूर : ‘विनादाखला शालेय प्रवेशाबाबतचा शासनाचा १८ जूनचा निर्णय चुकीचा आहे. तसेच वेतनेतर अनुदान मिळाले नाही व योग्य ती ...

Boycott on online education if government raises tuition fees | शैक्षणिक शुल्कला शासनाने आडकाठी केल्यास ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार

शैक्षणिक शुल्कला शासनाने आडकाठी केल्यास ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार

मलकापूर : ‘विनादाखला शालेय प्रवेशाबाबतचा शासनाचा १८ जूनचा निर्णय चुकीचा आहे. तसेच वेतनेतर अनुदान मिळाले नाही व योग्य ती शैक्षणिक फी घेण्यास शासनाने आडकाठी केली तर ऑनलाईन शिक्षणावर संस्था व शाळांमार्फत बहिष्कार घालण्यात येईल,’ असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिला.

शिष्टमंडळाच्यावतीने शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा करणे, वेतनेतर अनुदान मिळाले नाही व योग्य ती शैक्षणिक फी घेण्यास शासनाने आडकाठी केली तर ऑनलाईन शिक्षणावर संस्था व शाळांमार्फत बहिष्कार घालण्यात येईल.’ असा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना व सर्व घटकांनी महाराष्ट्र शासनाच्या अशा शैक्षणिक निर्णयाला विरोध केला पाहिजे व अशी धोरणे हाणून पाडली पाहिजेत. शासनाने वरील दोन्ही निर्णयांचा फेरविचार करावा, अशी मागणी बहुतांशी उपस्थितांनी केली.

रवींद्र फडणवीस म्हणाले, ‘शिक्षक हक्क कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून शासनाने विनादाखला प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय सर्वप्रकारच्या शाळा विद्यालयांना लागू केला तर शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडेल. याबाबत आमदार जयंत आसगावकर यांनी वेतनेतर अनुदान व विनादाखला शाळा प्रवेश याबाबत शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री स्तरावर प्रयत्न करणार आहे’, असे सांगितले.

रावसो पाटील, सचिन सूर्यवंशी, अबिदा इनामदार यांच्यासह बैठकीमध्ये राज्यातील तज्ज्ञ व शिक्षणसंस्था चालकांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Boycott on online education if government raises tuition fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.