शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 17:19 IST

: सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

ठळक मुद्देकास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा घाणीचे साम्राज्य : निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त

पेट्री/सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही अनेक तरूण व नागरिक कास पठार व तलाव परिसरात भटकंतीसाठी येत असतात. काही हुल्लडबाज तरुणांकडून तलावाच्या परिसरात पार्ट्या केल्या जातात. तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, वापरलेले मास्क तलावाच्या आवारात फेकून दिले जातात. त्यामुळे जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे.कास तलाव परिसरात दिवसेंदिवस कचऱ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. अविवेकीपणामुळे या पर्यटनस्थळांचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची चिंता निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. या पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलून स्वच्छता कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. मात्र, असे होताना दिसत नाही.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी असताना बहुसंख्य नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. कास तलावात जलविहार करणे, तेलकट भांडी साबण अथवा डिटर्जंटने धुणे, यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका असून, जलचरांनादेखील धोका उद्भवू शकतो.

टॅग्स :environmentपर्यावरणKas Patharकास पठारSatara areaसातारा परिसरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न