शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:24 IST

Mahabaleshwar Hill Station, Police, fraud, Crime News, Satara area न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व नीलेश रामदास थोरात यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा लक्ष्मण चोरमले (वय ५३, रा. कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देफसवणूकप्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा न्यायालयात नोकरी लावण्याचे दाखविले आमिष

महाबळेश्वर : न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व नीलेश रामदास थोरात यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा लक्ष्मण चोरमले (वय ५३, रा. कासवंड, ता. महाबळेश्वर) यांनी आखाडे व थोरात यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीमध्ये फिर्यादी चोरमले यांनी म्हटले आहे की, न्यायालयात विविध पदाकरिता जागा निघाल्या असून, न्यायाधीशांचे अंगरक्षक नीलेश रामदास थोरात हे माझ्या परिचयाचे आहेत. त्यांनी अनेकांना न्यायालयात नोकऱ्या लावल्या आहेत. तुमच्या मुलाला नोकरी नाही, मी तुमच्या मुलाच्या नोकरीचे काम करू शकतो. शिपाई पदासाठी दोन लाख, लिपिक पदासाठी अडीच लाख तर स्टेनो पदासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

संतोष आखाडे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैशांची जुळवाजुळव करून नीलेश थोरात यांच्या खात्यावर अडीच लाख रुपये त्यानंतर पाच लाख, पन्नास हजार असे आरटीजीएस करून त्यांच्या बँक खात्यामध्ये भरले व संतोष आखाडे यांना दीड लाख रुपये रोख घरी नेऊन दिले. अशा प्रकारे त्यांना नऊ लाख रुपये दिले. २०१८ मध्ये न्यायालयाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीमध्ये मुलांची नावे नव्हती. याबाबत संतोष आखाडे यांच्याकडे चौकशी केली असता ह्यपुढील यादीमध्ये तुमच्या मुलांची नावे असतील काळजी करू नका,ह्ण असे आखाडे यांनी मला सांगितले. मात्र त्यानंतर आलेल्या यादीमध्ये देखील आमच्या मुलांची नावे नव्हती पुन्हा आम्ही आखाडे यांची भेट घेतली असता त्यांनी पैसे परत न करता दमदाटी शिवीगाळ केली व उडवाउडवीची उत्तरे दिली.संतोष अखाडे यांनी आमच्याप्रमाणेच इतर अनेकांची फसवणूक केल्याचे आम्हाला समजले. काही लोकांनी एकत्र येऊन संतोष आखाडे यांची भेट घेतली. तेव्हा आमच्या पूर्वीच तेथे ३० ते ३५ फसवणूक झालेले लोक उपस्थित होते. सर्वांकडून संतोष आखाडे व नीलेश थोरात यांनी सुमारे ४९ लाख रुपये घेऊन आमची फसवणूक केली असे आनंदा लक्ष्मण चोरमले यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी