सातारा : लोणंदमध्ये एकाच दिवशी दोघांनी गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 02:18 PM2021-11-16T14:18:13+5:302021-11-16T14:18:46+5:30

लोणंद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका नवविवाहित वीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एका ७५ वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे.

Both committed suicide on the same day in Lonand Satara district | सातारा : लोणंदमध्ये एकाच दिवशी दोघांनी गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

सातारा : लोणंदमध्ये एकाच दिवशी दोघांनी गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

googlenewsNext

लोणंद - शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका नवविवाहित वीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एका ७५ वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे. सोनबा यदू खरात (वय ७५) व शुभांगी रोहन माने अशी या मृत दोघांची नावे आहेत. काल, (सोमवारी दि.१५) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे लोणंद परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब नगर लोणंद येथे सोनबा खरात यांनी आजारपणाला कंटाळूनआपल्या राहत्या घरातील गॅलरीत वायरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. तर याच दरम्यान शास्त्री चौक येथे राहणाऱ्या वीस वर्षीय विवाहीत शुभांगी माने या महिलेने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

अकरा महिन्यापूर्वी शुभांगीचा विवाह लोणंद येथील रोहन माने या युवकाशी झाला होता. शुभांगीचे माहेर शाहूपुरी, जि. सातारा आहे. घरची सर्व मंडळी दुपारी कामावर गेली असताना शुभांगीने राहत्या घरातील पत्र्याच्या अॅगंलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचे सह घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. दरम्यान रात्री उशीरा दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Both committed suicide on the same day in Lonand Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.