शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागठाणेत चक्री जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांचा छापा, बारा संशयितांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:54 IST

नागठाणे येथे चक्री जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

नागठाणे : नागठाणे येथे चक्री जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी बारा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.आनंद दिनकर खोटे, गणेश जनार्दन नलवडे, रोहित संजय बोडरे, हाजी बाशासाब मुल्ला, सुभाष दिनकर साळुंखे, सूरज अनिल काळे, दीपक उत्तम तोरणे, अशोक हणमंत मोहिते (सर्व रा. नागठाणे), दत्तात्रय रघुनाथ जाधव, सौरभ प्रकाश घोरपडे (दोघे रा. शेंद्रे) आणि सूरज शंकर जाधव (रा. अतित) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना नागठाणे हद्दीत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सेवारस्त्यावरील चौंडेश्वरी पान टपरीचे मागे पत्र्याचे टपरीमध्ये चक्री जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी शून्य ते नऊ अशा आकड्यावर लोकांकडून दहा रुपयांना शंभर रुपये असे स्वतःचे फायद्यासाठी चक्री नावाचा जुगार सुरु होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता काही इसमही पैसे लावून खेळत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. संशयित इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी (एमएच ११ सीई २१४४), संगणक, माऊस, राउटर, सीपीयु, युपीएस, असा ७१ हजार ६४० रुपयेचा माल जप्त केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस