बोरणे घाटात दरड कोसळली
By Admin | Updated: July 25, 2014 22:14 IST2014-07-25T21:49:35+5:302014-07-25T22:14:17+5:30
‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त प्रसिद्ध करून वाहनचालकांना धोक्याचा इशारा दिला होता.

बोरणे घाटात दरड कोसळली
परळी : सातारा-ठोसेघर मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत आहेत. दरड रस्त्याच्या एका बाजूलाच पडल्याने वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ-दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे डोंगरांमध्ये पाणी झिरपत आहे. या पाण्यामुळे खडक सुटू लागले आहेत. बोरणे घाटात दरड कोसळण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. संततधार पावसामुळे ठोसेघरचा धबधबा कोसळू लागला आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे हा रस्ता पर्यटकांसाठी धोक्याचा ठरू शकतो. ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त प्रसिद्ध करून वाहनचालकांना धोक्याचा इशारा दिला होता. जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दोन-तीन ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. डबर रस्त्याच्या एका बाजूलाच पडल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे. (प्रतिनिधी)