खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:36+5:302021-06-16T04:50:36+5:30

खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गावर खंबाटकी घाटात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा जाळून खून करून मृतदेह ...

The body of an unidentified woman was found in Khambhatki Ghat | खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा आढळला मृतदेह

खंबाटकी घाटात अज्ञात महिलेचा आढळला मृतदेह

खंडाळा : पुणे-सातारा आशियाई महामार्गावर खंबाटकी घाटात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा जाळून खून करून मृतदेह घाटात टाकला असल्याचे प्राथमिक तपासात दिसत असून, या घटनेचा खंडाळा पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटाच्या पहिल्या वळणावर एक मृतदेह असल्याची माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्यासह पोलीस पथकाने घाटाकडे धाव घेतली. घाटाच्या या वळणावर डाव्या बाजूच्या नाल्यात मृतदेह टाकल्याचे दिसून आले. पाहणी केल्यानंतर पायातील पैंजण व जोडवी यावरून साधारणपणे २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह असल्याचे समोर येत असून, तो अर्धवट जाळल्याचे दिसून आले.

रात्रीच्या अंधारात हा मृतदेह घाटात टाकला गेल्याची शक्यता आहे. दुपारी तीनच्या सुमारास खंडाळा पोलिसांना वाटसरूंनी माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश इंगळे, उपनिरीक्षक स्वाती पवार व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. या परिसराची व मृतदेहाची प्राथमिक पाहणी करून त्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश इंगळे करीत आहेत.

चौकट..

खंबाटकी घाटात दुसरी घटना...

खंबाटकी घाटात यापूर्वीही अनेकदा मृतदेह आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः पुणे, मुंबई येथील व्यावसायिक, ठेकेदार यांचाही त्यात समावेश होता. खंबाटकी घाटातील दाट झाडीचा व निर्जन जागेचा वापर अशा घटनांसाठी होत असतो. त्यामुळे पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. या घटनांपैकी अनेक घटनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. खंडाळा तालुक्यात लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत दोनच दिवसांपूर्वी कालव्यात सापडलेल्या मृतदेहाचा तपास करून खुनाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर लगेचच खंबाटकी घाटात दुसरी घटना उघडकीस आल्याने तालुक्यात मोठी चर्चा आहे.

......

फोटो मेल केला आहे.

Web Title: The body of an unidentified woman was found in Khambhatki Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.