आत्महत्या केलेल्या जवानाचे पार्थिव आज सायंकाळी गावी येणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 10:14 IST2017-11-07T10:08:51+5:302017-11-07T10:14:25+5:30
सातारा जिल्ह्यातील निसराळे गावच्या जवानाने छत्तीसगड येथे ड्युटीवर असताना स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या केली असून पार्थिव आज मंगळवारी सायंकाळी गावी आणले जाणार आहे.

आत्महत्या केलेल्या जवानाचे पार्थिव आज सायंकाळी गावी येणार !
सातारा : छत्तीसगड राज्यात सेवा बजावत असताना सीमा सुरक्षा दलाचा जवान प्रशांत दिनकर पवार यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ते सातारा तालुक्यातील निसराळे गावचे रहिवासी असून आज मंगळवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव गावी आणले जाणार आहे.
तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. निसराळे येथे दसरा सणाला ते सुट्टीवर येऊन गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, एक बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.
जवान पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.