डबेवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:14+5:302021-04-06T04:38:14+5:30
शेंद्रे : सातारा तालुक्यातील डबेवाडी येथे प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था ...

डबेवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात
शेंद्रे : सातारा तालुक्यातील डबेवाडी येथे प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था व डबेवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरास सातारा बाजार समितीचे सभापती ॲड. विक्रम पवार, राहुल दळवी, सातारा जिल्हा बँकेचे माजी कर्मचारी बोबडे हे उपस्थित होते.
सरपंच सदाशिव माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराला सुरुवात झाली. यावेळी दिवसभरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच सदाशिव माने, उपसरपंच उमा माने, सदस्य रघुनाथ भोसले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कदम, अध्यक्ष संभाजी शेळके, उपाध्यक्ष विकास काटकर, सचिव प्रकाश कुलकर्णी, खजिनदार नंदकुमार माने, माजी अधिकारी धर्मा गंभरे, नंदू जाधव, विष्णू पाटील, धनाजी शेंडगे, मीनल लांजेकर, साहेबराव जाधव, गंगाराम धनवडे, सतीश गुजर आदी उपस्थित होते.