शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
4
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
5
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
6
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
7
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
8
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
9
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
10
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
11
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
12
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
13
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
14
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
15
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
16
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
17
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
18
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
19
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
20
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

हुश्शऽऽऽ आंधळी धरण भरले, माणगंगा दुथडी भरून वाहू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 15:03 IST

माणगंगा नदीवरील आंधळी धरण सोमवारी पहाटे भरले असून माणगंगा नदी आता उगमापासून दुथडी वाहू लागली आहे. यामुळे आंधळी, टाकेवाडी, परकंदी, पांगरी, वडगाव, दहिवडी, बिदाल, गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावाना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देहुश्शऽऽऽ आंधळी धरण भरले, माणगंगा दुथडी भरून वाहू लागली बिदाल, आंधळी, दहिवडीसह गोंदवलेचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटला

दहिवडी : माणगंगा नदीवरील आंधळी धरण सोमवारी पहाटे भरले असून माणगंगा नदी आता उगमापासून दुथडी वाहू लागली आहे. यामुळे आंधळी, टाकेवाडी, परकंदी, पांगरी, वडगाव, दहिवडी, बिदाल, गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावाना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.माण तालुक्याचा सरासरी पाऊस ४६५ मिलीमीटर होत असतो मात्र ही सरासरी अनेक वर्षे पावसांनी ओलंडली नव्हती. गेल्या वर्षी ७०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे माण तालुक्यातील तलाव भरले होते. तीच अवस्था यावर्षी होत आहे. आज आखेर माण तालुक्यात ५१० मिलिमीटर पाऊस पडल्याने सलग दुसऱ्या वर्षी ५०० मिलिमीटर पाऊस पडला आहे.माण तालुक्यात माणगंगा नदीवर आंधळी या ठिकाणी धरण आहे. हे धरण भरल्यानंतरच माणगंगा उगमापासून शेवटापर्यंत वहात असते. रविवारी हे धरण भरण्यासाठी २ फूट कमी होते. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास आंधळी धरणाच्या वरच्या बाजूला शिरवली, कुळकजाई, टाकेवाडी, परकंदी, मलवडी, आंधळी, भांडवली या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला.

त्यामुळे आंधळी धरणाच्या वरच्या बाजूकडील कासारवाडी, बोलाई, परकंदी, टाकेवाडी, शेडगेवाडी, गायदरा हे ओडे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली. पहाटे तीनच्या सुमारास आंधळी धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडले.माणगंगा नदी दुथडी वाहात असून या नदीवरील आंधळी, बिदाल, दहिवडीतून शेवरीकडे जाणारे पुल पाण्याखाली गेले आहेत. या पुढे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आंधळी धरण भरले असून याचा बिदाल, आंधळी, पांगरी परिसरातील शेतीला फायदा होणार आहे. या धरणाला डावा कालवा वडगावपर्यंत तर उजवा कालवा दहिवडीपर्यंत असून हे दोन्ही कालवे आता दुरुस्त करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर