भाजपचे लोणंदला चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:31+5:302021-06-27T04:25:31+5:30
लोणंद : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी व आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीनतेविरुद्ध लोणंद येथे माजी समाजकल्याण सभापती ...

भाजपचे लोणंदला चक्का जाम आंदोलन
लोणंद : महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी व आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीनतेविरुद्ध लोणंद येथे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील व महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लोणंद येथील शिरवळ चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, आनंदराव शेळके-पाटील, अनुप सूर्यवंशी, राहुल घाडगे, हर्षवर्धन शेळके-पाटील, बापूराव धायगुडे, प्रदीप क्षीरसागर, अशोकराव धायगुडे, रामदास शिंदे, देविदास चव्हाण, साजिदभाई मुल्ला, नीलकंठ भूतकर, दीपिका घोडके, वनिता शिर्के, दर्शना रावळ, तेजश्री पवार, ढगेशशेठ गालिंदे, महादेव क्षीरसागर, राहुल हाडके, आप्पासो शेळके, अनिल कुंभार, गोपाळ धायगुडे, मोहनराव शेळके, संदीप शेळके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.