वडूजला भाजपचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:33+5:302021-06-27T04:25:33+5:30

वडूज : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याबरोबरच रोहिणी आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायालयीन पाठपुरावा व्हावा आणि ...

BJP's Chakkajam agitation in Vadodara | वडूजला भाजपचे चक्काजाम आंदोलन

वडूजला भाजपचे चक्काजाम आंदोलन

वडूज : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याबरोबरच रोहिणी आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायालयीन पाठपुरावा व्हावा आणि ओबीसी राजकीय आरक्षण त्वरित मिळावे आणि इतर आदी मागण्यांसाठी खटाव तालुका भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाला लेखी निवेदन दिले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, नगरसेवक अनिल माळी, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, संजय काळे, वचन शहा, श्रीकांत बनसोडे, सोमनाथ जाधव, संजय अंबिके आदींसह भाजपचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य शासनाने ओबीसी राजकीय आरक्षण तातडीने पूर्ववत कायदेशीर होण्याबाबत हालचाली कराव्यात. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा. मराठा समाज आरक्षण कायदेशीर पातळीवर सिद्ध होण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनामार्फत योग्य तो न्यायालयीन पाठपुरावा करून कायदेशीर आरक्षण लवकर मंजूर करावे. अशा विविध मागण्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रा. सदाशिव खाडे, भाजपा तालुकाध्यक्ष धनजंय चव्हाण, प्रा. अजय शेटे, सरपंच वैभव माने, नगरसेवक अनिल माळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अर्जुन खाडे, रवी पेठे, नीलेश कर्पे, नाना पुजारी, विशाल बागल, अशोक काळे, अरुण यादव, सुभाष चव्हाण आदींसह भाजप कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी होते.

-------------------------

२६वडूज

फोटो : ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी वडूज येथे भाजप कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको केला. ( शेखर जाधव )

Web Title: BJP's Chakkajam agitation in Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.