साताऱ्यात भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:16+5:302021-03-22T04:35:16+5:30

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावर भाजपच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे माजी मुख्यमंत्री ...

BJP's agitation in Satara | साताऱ्यात भाजपचे आंदोलन

साताऱ्यात भाजपचे आंदोलन

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावर भाजपच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार साताऱ्यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अमोल सणस, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, गणेश पालखे, सुनील जाधव, चंदन घोडके, प्रशांत जोशी, मनीषा पांडे, रवी आपटे, विक्रम बोराटे, रिना भणगे, मोनाली पवार, सुनीता शहा, संदीप वायदंडे आदी सहभागी झाले होते.

फोटो २१सातारा भाजप फोटो...

सातारा येथे रविवारी भाजपच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला.

Web Title: BJP's agitation in Satara