शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार..

By नितीन काळेल | Updated: March 28, 2024 19:32 IST

सातारा : महायुतीतील सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून मतदारसंघ भाजपला देण्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. या बदल्यात अजित पवार ...

सातारा : महायुतीतील सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून मतदारसंघ भाजपला देण्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभेत एका जागेचे प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील साताऱ्याचा उमेदवार उदयनराजे हेच असणार हे स्पष्ट होत आहे.लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच सातारा मतदारसंघ चर्चेत आला आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत मतदारसंघाचा ताबा कोण घेणार यावरुन राजकारण रंगले. आता निवडणूक जाहीर होऊन १५ दिवस होत आहेत. तरीही महायुतीत मतदारसंघ कोणाकडे जाणार हे जाहीर झालेले नाही. मात्र, युतीत मतदारसंघ शिवसेनेकडे असलातरी भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटातच खरी रस्सीखेच सुरू होती. अजित पवार गट कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ देण्यास आजही तयारी नाही. यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अनेकवेळा गाऱ्हाणे गायले आहे. तसेच बुधवारीच पुण्यात पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांच्याबराेबर बैठक झाली. यावेळीही सातारा मतदारसंघ सोडू नका, असे नेत्यांनी आर्जव केले. कारण, येत्या काही महिन्यात विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिकांची निवडणूक आहेत. त्यामुळे पक्षाला आणखी ताकद मिळण्यासाठी सातारा लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात आला होता. पण, याच बैठकीत सातारा मतदारसंघ भाजपला सोडला तर आपल्याला एक राज्यसभेची जागा मिळणार असल्याचेही संकेत देण्यात आले. त्यामुळे सातारा मतदारसंघ भाजपसाठी सोडणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. असे झालेतर साताऱ्यातून महायुतीचा उमेदवार हे खासदार उदयनराजे भोसले हेच असणार आहेत.

सातारा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी सुरुवातीला भाजपचे वरिष्ठ अनुकूल नव्हते, अशी माहिती सध्या प्राप्त होऊ लागली आहे. मात्र, खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजीतून आपली दखल घ्यायला लावली. तसेच खासदार उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीला गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते सातारला चार दिवसानंतर आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावरुनच उदयनराजे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महायुतीत मतदारसंघ भाजपकडे राहण्याचेच संकेत आहेत.

उदयनराजेंनी १५ दिवसांपूर्वीच निवडणुकीचे संकेत दिलेले..लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजे यांनी गेल्या वर्षभरात कधीच वक्तव्य केले नाही. पत्रकारांनी खोदून विचारल्यावरही त्यांनी स्पष्ट संकेत दिले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या दिवशी साताऱ्यात विकासकामांचे उद्घघाटन झाले. या कार्यक्रमाला उदयनराजे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्याकडे बस, रेल्वेचे तिकीट आहे. तसेच मी राजकीय संन्यास घेणार नाही, असेही ठणकावून सांगितले होते. त्यामुळे त्यावेळीच त्यांची दिशा काय असणार हे समोर आले होते. त्यातच मागील १५ दिवसांतील इतर काही घडामोडी पाहता उदयनराजे हे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक कसेही आणि कोणत्याही परिस्थितीत लढविणार, हेही स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाBJPभाजपाAjit Pawarअजित पवार