सातारा : जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धक्का दिला. सर्वाधिक ४ नगरपालिका व एका नगरपंचायतीत सत्ता मिळविली, तर १० पैकी ७ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीला वाई, महाबळेश्वर व रहिमतपूर या तीन नगरपालिकेत सत्ता मिळाली. कराड व पाचगणीमध्ये स्थानिक आघाडीला यश मिळाले.जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचा निकाल रविवारी (दि. २१) जाहीर झाला. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी साताऱ्यात अमोल मोहिते, मलकापूरला तेजस सोनवले, फलटणला समशेरसिंह नाईक-निंबाळकर व म्हसवडला पूजा वीरकर यांच्या विजयासह या चारही नगरपालिकेत भाजपने सत्ता खेचून आणली. तसेच मेढा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष रूपाली वारागडे यांच्या विजयासह भाजपची सत्ता आली. शिवाय वाईच्या नगराध्यक्षपदी अनिल सावंत व रहिमतपूरच्या नगराध्यक्षापदी वैशाली माने हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे जिल्ह्यात भाजप हा मोठा भाऊ झाला आहे.
वाचा : साताऱ्यात भाजप ‘सिकंदर’ तर अपक्ष उमेदवार ‘धुरंधर’!, पालिकेत शिंदेसेनेचीही झाली एंट्रीवाई, रहिमतपूर व महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली; पण वाईचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नितीन कदम व रहिमतपूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदना माने पराभूत झाल्या. राष्ट्रवादीचे महाबळेश्वरचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे हे विजयी झाले. तसेच कराडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेना पुरस्कृत स्थानिक आघाडीचे राजेंद्र यादव आणि पाचगणीत राष्ट्रवादी (अजित पवार) पुरस्कृत स्थानिक आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप बगाडे निवडून आले आहेत.वाई, रहिमतपूरला ‘गड आला; पण सिंह गेला...’वाई नगरपालिकेतील २३ जागांपैकी १२ जागा जिंकून आणि रहिमतपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आघाडीने ११ जागा जिंकून गड राखला; पण दोन्ही नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे दोन्ही नगरपालिकेत राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी झाली.कराड, पाचगणीला स्थानिक आघाडीला यश...कराड नगरपालिकेत भाजपच्या उमेदवाराविरोधात शिंदेसेना व दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन ‘यशवंत लोकशाही आघाडी’ रिंगणात उतरविली होती. या आघाडीने १९ जागा जिंकत सत्ता मिळविली. तसेच, पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने यश मिळविले असून, त्यांचे नगराध्यक्षासह आणि १२ नगरसेवक निवडून आले.
फलटणमध्ये रामराजेंना धक्काफलटण नगरपालिकेत भाजप व शिंदेसेनेत थेट निवडणूक झाली. त्यामध्ये शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे यांचा पराभव झाला. त्याठिकाणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे भाऊ समशेरसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाले.
साताऱ्याच्या नगराध्यक्षांना सर्वाधिक मताधिक्य...सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना ५७ हजार ५८७ मते मिळाली, तर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांना १५ हजार ५५५ मते मिळाली. त्यामुळे भाजपचे मोहिते यांना महाराष्ट्रात सर्वाधिक ४२ हजार ३२ मताधिक्य नगराध्यक्षपदासाठी मिळाले.
Web Summary : BJP gained control in Satara local elections, winning most Nagaradhyaksha posts. Ramraje Naik-Nimbalkar faced setback in Phaltan. BJP secured power in four municipalities.
Web Summary : सतारा स्थानीय चुनावों में भाजपा का दबदबा, अधिकांश नगराध्यक्ष पद जीते। फलटण में रामराजे नाइक-निंबालकर को झटका। भाजपा ने चार नगरपालिकाओं में सत्ता हासिल की।