शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:29 IST

दहिवडी पोलिसांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

मायणी : मृत पिराजी विष्णू भिसे यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून बनावट व्यक्ती उभी करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी मायणी येथील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. त्यावरून दहिवडी पोलिसांनी आमदारजयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मायणी येथील महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मायणीतील वडिलोपार्जित जमीन गट नंबर ७६९, ७८१, ८१२ ही असून तिची वहिवाट महादेव भिसे आणि त्यांचे भाऊ करीत आहेत. त्यांचे वडील पिराजी विष्णू भिसे यांचा ८ ऑक्टोबर २०१६ रोजी मायणी येथे मृत्यू झाला आहे. त्यांचे वारस म्हणून महादेव भिसे, भाऊ शंकर, हरी, विठ्ठल, पुतण्या शुभम शिवाजी भिसे, बहीण लक्ष्मी नाथा वायदंडे व रुक्मिणी शशिकांत अवघडे, आई नमुनाबाई पिराजी भिसे आहेत.वडिलोपार्जित मिळकत गट नंबर ७६९ लगत गट नंबर ७६८ ही छत्रपती शिवाजी एज्युकेशन मायणीतर्फे तत्कालीन अध्यक्षांच्या मालकी कब्जे वहिवाटीची आहे. या मिळकतीच्या अनुषंगाने संबंधित मिळकत वडिलोपार्जित मिळकतीतून संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या संस्थेच्या मिळकतीत जाण्यासाठी सहायक संचालक नगररचना सातारा यांच्या कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्याप्रमाणे संबंधित रस्त्याची रुंदी मंजूर सातारा प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियमानुसार १५ मीटर इतकी आवश्यक असल्याने गट नंबर ७६९ मधून जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असणे बंधनकारक होते.त्यावेळी जयकुमार गोरे यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी माण-दहिवडी यांच्यासमक्ष ११ डिसेंबर २०२० रोजी प्रतिज्ञापत्र केले. ते ॲफिडेव्हिट नं. ४३००\२०२० ने नोंदले आहे. पिराजी विष्णू भिसे यांचा ८ ऑक्टोबर २०१६ रोजी मृत्यू झालेला असताना त्यांच्याजागी कोणी तरी व्यक्ती उभी केली.त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून साक्षीदार दत्तात्रय कोंडीबा घुटुकडे, महेश पोपट बोराटे यांच्याशी संगनमत करून प्रतिज्ञापत्राकरिता श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याहस्ते दत्तात्रेय धोंडीबा घुटुकडे (रा. विरळी, ता. माण) यांच्यानावे शंभर रुपयांचा मुद्रांक घेऊन जयकुमार भगवान गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटुकडे, महेश पोपट बोराटे, अनोळखी इसम पिराजी विष्णू भिसे यांच्यानावे ॲफिडेव्हिट करणारी व्यक्ती, बनावट आधारकार्ड करणारा यांनी भिसे कुटुंबाची फसवणूक केली. मृत पिराजी भिसे यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र करण्याचा व ते सहायक संचालक नगररचना सातारा, उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या कार्यालयात दाखल करून फसवणूक केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपाMLAआमदारJaykumar Goreजयकुमार गोरेAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाfraudधोकेबाजी