शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
3
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
4
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
5
भारतातील १ कप चहाच्या किमतीत व्हेनेझुएलात मिळतंय ३ लिटर पेट्रोल; जाणून घ्या किती आहेत दर?
6
"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
7
Ashes Test : ऑस्ट्रेलियाचाच बोलबाला! अ‍ॅशेस मालिका ४-१ अशी जिंकत इंग्लंडच्या साथीनं रचला विश्वविक्रम
8
पाकिस्तानच्या 'या' ३० वर्षांच्या मुलीने लष्कराच्या नाकी नऊ आणले! कोण आहे 'ही' सुंदरी?
9
आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
10
Jagannath Puri: आजही गोडधोड पक्वान्न सोडून जगन्नाथाला पहिला नैवेद्य खिचडीचाच का?
11
Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा
12
तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली; तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची वेळ! नेमकं काय झालं?
13
सारा तेंडुलकर मराठीत बोलली, आजीची गोड आठवण सांगितली; Viral Video पाहून नेटकरी फिदा
14
जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
15
बँक ऑफ बडोदामधून ₹५० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी? EMI किती असेल, पाहा
16
ढाका हादरलं! भरचौकात माजी नेत्याची निर्घृण हत्या; बांगलादेशात लष्कर तैनात, रस्त्यावर राडा
17
लोंढ्यांचा त्रास कोण भोगतोय? मांजरेकरांचा प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले आपण...; मांजरेकर म्हणाले मध्यमवर्गीय...
18
'गृहिणी म्हणजे घराचं मॅनेजमेंट सांभाळणारा बिनपगारी जॉब, फक्त लक्षात ठेवा 'ही' एक गोष्ट!'-सद्गुरु
19
१० मुलींच्या जन्मानंतर ११वा मुलगा झाला! जन्मदाता पिता मात्र बेरोजगार; मनातील भावना सांगताना म्हणाले.. 
20
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Updated: May 10, 2025 19:44 IST

दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच

कराड : काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करीत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाला आहे हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कराड येथे बोलताना लगावला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शनिवारी दुपारी कराड येथे आले होते.त्यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी त्यांनी अभिवादन केले.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अजितराव पाटील- चिखलीकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, तालुकाध्यक्ष निवास थोरात, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, अमित जाधव, रणजित देशमुख, शेरखान पठाण, तात्या पाटील आदींची उपस्थिती होती.सपकाळ म्हणाले, काँग्रेसची भूमिका ही नेहमी भारत जोडोची राहिलेली आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, दोन कुटुंबे एकत्र आली तर आम्हाला आनंदच होईल. ..त्यामुळे आघाडी करावी लागलीखरंतर गतकाळात आघाडीची अपरिहार्यता होती. त्यामुळे राजकारणात आम्हाला आघाडी करावी लागली. त्याचेच मोठे नुकसान आम्हाला सोसावे लागले. मात्र आता आम्ही नव्याने काँग्रेसची बांधणी चांगल्या पद्धतीने करणार आहोत.असेही सपकाळ एका प्रश्नावर म्हणाले.

'तो' निर्णय स्थानिक पातळीवरचसन २०२५ हे वर्ष पक्षाने संघटनात्मक वर्ष जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अपेक्षित फेरबदल, दुरुस्त्या होतील या शंका नाही. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या स्वतंत्र लढवायच्या ही स्थानिक पातळीवर पुन्हा आघाड्या करूनच लढवायच्या हा निर्णय जिल्हास्तरावरील स्थानिक नेते घेतील. तशी मोकळीक त्यांना देण्यात आली असल्याचेही ते एका प्रश्नावर म्हणाले. काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाहीकाँग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना कोणी करत असले तर काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही. कारण भारताचा आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए एकच आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढच्या काळामध्ये काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल. काँग्रेस पक्षाला दीडशे वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे कोणी ओसाड गावची पाटीलकी माझ्याकडे आली असे म्हणत असेल तर ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास सध्या ऑपरेशन सिंदूर सरकारने सुरू ठेवले आहे. त्याबाबत सगळे पक्ष सरकारच्या पाठीशी असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत छेडले असता सपकाळ म्हणाले, खरंतर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मोडून तोडून ते दाखवले जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर सगळ्यांनी एकत्रीत सामोरे जाण्याची आहे हे समजून घेतले पाहिजे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBJPभाजपा