शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांच्या जप्तीप्रकरणी भाजप उच्च न्यायालयात जाणार !

By admin | Updated: October 16, 2014 00:09 IST

‘कऱ्हाड दक्षिण’चा संदर्भ : पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सातारा : जिल्हा पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कऱ्हाड दक्षिणमधील राजकीय विरोधक भाजपला बदनाम करत असल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी राजकीय हेतूने एका राजकीय पक्षाला मदत होईल, असे कृत्य केले आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राजकीय विरोधकांनी जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून कऱ्हाड येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करण्यास भाग पाडले. दहा-बारा दिवस रात्री-अपरात्री पोलीस कर्मचारी भरत पाटील यांच्या घराच्या आजूबाजूला फिरत असून, गेले काही दिवस त्यांचा फोन टॅप करण्याबरोबरच गाडीचा पाठलागही केला जात आहे. भरत पाटील यांनी दि. १३ आॅक्टोबर रोजी भाजपच्या खात्यातून सात लाख रुपये रक्कम धनादेशाद्वारे काढली होती. ही रक्कम भाजप प्रदेश कार्यालयाने निवडणूक खर्चाकरिता पाठविली होती. महाराष्ट्र बँकेतून ही रक्कम काढून घेत असतानाच पोलिसांनी राजकीय द्वेषापोटी खाली थांबून रक्कम ताब्यात घेतली. पोवई नाका येथे रक्कम ताब्यात घेतल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले. त्याची कागदपत्रेही दाखविली. मात्र, पोलिसांनी ऐकले नाही. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नेमून दिलेला प्रतिनिधी उपस्थित नव्हता. ही कारवाई कऱ्हाड दक्षिणमधील राजकीय विरोधकांनी विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन केली आहे. पोलिसांचे हे कृत्य आदर्श आचारसंहिता भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात भाजप लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)