शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

By प्रमोद सुकरे | Updated: June 5, 2024 16:05 IST

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात, फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे निकालातून दाखवले 

कराड : भाजपने आमचा परिवार फोडला, पक्ष फोडला.त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात भूमिका चालतील.पण त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही.महाराष्ट्रातील लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही हे त्यांनी निकालातून दाखवून दिले आहे.असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना नाव न घेता लगावला.युवा नेते रोहित पवार बुधवारी कराडच्या प्रतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. तेव्हा माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, यु्वा नेते सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर,प्रशांत यादव, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे,जशराज पाटील, सौरभ पाटील आदिंची उपस्थिती होती.आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये लोकांच्या माध्यमातून आपल्या विचाराला लोकसभा निवडणुकीत यश मिळालेले आहे.त्यामुळे लोकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. खरंतर यशवंतराव चव्हाण यांचे विचार फक्त फोटो लावून मिळत नसतात. ते विचार जपावे लागतात. अन् ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ते विचार कायमच जपलेले आहेत. म्हणूनच यशवंत विचारप्रेमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी घेईल. त्याच्यात जास्तीत जास्त नवीन चेहरे पाहायला मिळतील.असेही पवार यांनी सांगितले.अजित पवार पुन्हा कराडला आत्मक्लेश करण्यासाठी येतील ? यापूर्वी राजकारणात काही चुका झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी आत्मकलेश करण्यासाठी आले होते. याची आठवण करून देत अजित पवार पुन्हा कराडला आत्मक्लेश करण्यासाठी येतील का? याबाबत छेडले असता हा त्यांचा प्रश्न आहे असे रोहित पवार यांनी सांगणे पसंद केले.

म्हणून मी 'तसे' ट्विट केले 'बच्चा बडा हो गया है!' असे आपण ट्विट केले आहे. नेमके हे तुम्हाला कोणाला सांगायचे आहे? असा प्रश्न विचारताच बच्चा म्हणून ज्यांनी आम्हाला या निवडणूक प्रचारात हिणवले होते. त्यांच्यासाठी माझे ते मत आहे. आता तर लोकांनी आम्हाला पाठिंबा देऊन निकालातून दाखवून दिले आहे की बच्चा कोण आहे ते. आम्ही तर स्वतःला आजही कार्यकर्ता समजतो. पण युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. असच मला सांगायचे आहे असे रोहित पवार म्हणाले.

सातारच्या पराभवाचा अभ्यास करावा लागेलकराड परिसर हा यशवंत विचाराचा आहे. मात्र याच लोकसभा मतदार संघात यशवंत विचाराचा पराभव झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, खरंच हा निकाल अनपेक्षित लागला.आम्हा सर्वांना याबाबत अभ्यास करावा लागणार आहे.पण शशिकांत शिंदेंनी कमी वेळात दिलेली लढत ही निश्चितच चांगली आहे .भाजपच्या मोठ- मोठ्या नेत्यांनी सातारा मतदार संघात मोठी ताकद लावली होती. पैशाचा मोठा वापर झाला ही बाब आमच्या कानावर आली आहे.असेही पवार म्हणाले.

विचारांचा पराभव झाला हे महत्त्वाचे

पार्थ पवारांनंतर सुमित्रा पवार यांचा देखील पराभव झाला आहे. या पराभवांकडे तुम्ही कसे पहाता?असे रोहित पवारांना विचारताच ते म्हणाले, व्यक्ती महत्त्वाची नाही विचारांचा पराभव झाला हे जास्त महत्त्वाचे आहे.

अजित पवारांसोबतचे १८ आमदार संपर्कात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे १८ आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात आहेत? याबाबत आपण भाष्य केले आहे. याकडे लक्ष वेधले असता रोहित पवार म्हणाले, होय त्यांचे१८ ते १९ आमदार आमच्या पक्ष प्रमुखांच्या संपर्कात आहेत. पण त्यापैकी कोणाला सोबत घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे पक्षप्रमुखच ठरवतील. पण ज्यांनी अडचणीच्या काळात मदत केली त्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल.असेही ते म्हणाले. पण त्यांचे १२ आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत. हे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच ते१२ आमदार काय करतील ते पुढच्या काही दिवसात समोर येईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडRohit Pawarरोहित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा