शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बिहारची शस्त्रे साताऱ्यात

By admin | Updated: September 17, 2014 22:27 IST

बिहारची शस्त्रे साताऱ्यात

सातारा : बिहारमधून साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.प्रशांत शंकर कदम (वय २६, रा. साप, ता. कोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री कदम हा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक के. जी. घाडगे, विकास जाधव, हवालदार उत्तम दबडे, नितीन शेळके, रामा गुरव, संजय जाधव, संजय पवार यांनी तेथे सापळा लावला. त्यावेळी प्रशांत कदमला या टीमने पकडले. त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर त्याची झडती घेतली असता. त्याच्या कमरेला गावठी रिव्हॉल्व्हर सापडले. बिहारमधील एका युवकाने हे रिव्हॉल्व्हर आपल्याला ४० हजारांत विकल्याचे चौकशीदरम्यान त्याने सांगितले. गेल्या वर्षीही एका युवकाकडे पोलिसांना पिस्तूल सापडले होते. त्या युवकानेही बिहारमधूनच आणलेले पिस्तूल विकत घेतले असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे बिहारमधून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची तस्करी होत असल्याचे उघड होत आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावे. जेणेकरून रिव्हॉल्व्हर तस्करीचा छडा लागेल, असा तपास करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)कोण हा प्रशांत कदम..प्रशांत कदम हा चार-पाच वर्षांपूर्वी कुस्ती खेळत होता. खरंतर तो पहिलवान म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो वाळू व्यवसायत गुंतला आहे. मित्रांबरोबर त्याने वाळू ठेकेदारीमध्ये भागीदारी केली आहे. या पैशातूनच त्याने रिव्हॉल्व्हर खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.