बिहारची शस्त्रे साताऱ्यात

By Admin | Updated: September 17, 2014 22:27 IST2014-09-17T21:45:55+5:302014-09-17T22:27:27+5:30

बिहारची शस्त्रे साताऱ्यात

Bihar's weapons in Satara | बिहारची शस्त्रे साताऱ्यात

बिहारची शस्त्रे साताऱ्यात

सातारा : बिहारमधून साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.
प्रशांत शंकर कदम (वय २६, रा. साप, ता. कोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री कदम हा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक के. जी. घाडगे, विकास जाधव, हवालदार उत्तम दबडे, नितीन शेळके, रामा गुरव, संजय जाधव, संजय पवार यांनी तेथे सापळा लावला. त्यावेळी प्रशांत कदमला या टीमने पकडले. त्याला स्थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर त्याची झडती घेतली असता. त्याच्या कमरेला गावठी रिव्हॉल्व्हर सापडले. बिहारमधील एका युवकाने हे रिव्हॉल्व्हर आपल्याला ४० हजारांत विकल्याचे चौकशीदरम्यान त्याने सांगितले. गेल्या वर्षीही एका युवकाकडे पोलिसांना पिस्तूल सापडले होते. त्या युवकानेही बिहारमधूनच आणलेले पिस्तूल विकत घेतले असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे बिहारमधून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची तस्करी होत असल्याचे उघड होत आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावे. जेणेकरून रिव्हॉल्व्हर तस्करीचा छडा लागेल, असा तपास करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
कोण हा प्रशांत कदम..
प्रशांत कदम हा चार-पाच वर्षांपूर्वी कुस्ती खेळत होता. खरंतर तो पहिलवान म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो वाळू व्यवसायत गुंतला आहे. मित्रांबरोबर त्याने वाळू ठेकेदारीमध्ये भागीदारी केली आहे. या पैशातूनच त्याने रिव्हॉल्व्हर खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Bihar's weapons in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.