शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘ते’ झोपेतून उठले, दरोडेखोरांना भिडले; अक्रित घडण्यापूर्वी लोकांनाही जागे केले; मेणवलीतील थरारक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:42 IST

सातारा: गाढ झोपेत असताना हाॅलमधील लाइट सुरू झाली. आवाजाने जाग आली म्हणून पाहिलं तर मध्यरात्री घरात दहा ते बारा ...

सातारा: गाढ झोपेत असताना हाॅलमधील लाइट सुरू झाली. आवाजाने जाग आली म्हणून पाहिलं तर मध्यरात्री घरात दहा ते बारा दरोडेखोर हातात कोयता, चाकू, लाकडी दांडके घेऊन घुसले होते. काय करावं हे समजलं नाही. पण, धाडस करून एका दरोडेखोरांशी झटापट केली. मागचा दरवाजा उघडून बाहेर गेलो, तर बाहेरही एक दरोडेखोर होता. त्याच्याशीही चांगलीच हातापायी झाली. कसाबसा तेथून शेतात धाव घेतली. अन् लोकांना जागं केलं. अजून काही वेळ दरोडेखोर घरात थांबले असते, तर भलतचं घडलं असतं, असे चिंतीत होऊन वाई तालुक्यातील मेणवलीतील भूषण कोचळे ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.मेणवली येथे भूषण कोचळे आणि त्यांचा भाऊ एकत्र राहतात. भूषण कोचळे हे पाचगणी येथे एका खासगी शाळेवर शिक्षक आहेत. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या घरावर दहा ते बाराजणांनी सशस्त्र दरोडा टाकून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. या धक्क्यातून हे कुटुंबीय अद्याप सावरले नाही. पैसे, दागिने नेले, त्याचे कुटुंबीयांना काहीही वाटले नाही. परंतु, पैशांपेक्षा घरातील स्त्रिया, लहान मुले यांच्या बाबतीत उलटसुलट घडलं नाही. याचे समाधान त्यांना आहे. अजून काही मिनिटे घरात चोरटे थांबले असते, तर कदाचित भलतंच घडलं असतं, असं काळजीच्या सुरात भूषण कोचळे सांगू लागले. बेडरुममध्ये दोन लहान मुली, एक मुलगा, वहिनी आणि भाऊ होता. दरोडेखोरांनी झोपलेल्या लहान मुलीच्या आणि झोपेतून जागे झालेल्या १२ वर्षांच्या प्रियाच्या गळ्याला चाकू लावला. ओरडू नका, काय असेल ते द्या, असं म्हणून त्यांनी बॅगा तपासण्यास सुरुवात केली. मुलांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांचा भाऊ बेडवर गप्प बसला होता. साधारण वीस मिनिटे दरोडेखोर बॅगा, कपाट तपासत होते. याचदरम्यान माझी दरोडेखोरांशी झटापट सुरू होती. त्यांच्या तावडीतून कसाबसा निसटून ओरडतच घराबाहेर पडलो. त्यामुळे लोक जागे होतील, याची धास्ती दरोडेखोरांना लागल्याने त्यांनी घरातून धूम ठोकली, असं भूषण कोचळे यांनी सांगितलं.

‘त्यांच्या’ नजरासुद्धा वेगळ्या होत्यासंबंधित दरोडेखोर २० ते २२ वर्षांच्या वयोगटातील होते. त्यांच्या नजरासुद्धा वेगळ्या होत्या. त्यांना लवकरात लवकर घरातून हाकलण्यात मला यश आलं. अन्यथा नको ते घडलं असतं, असा भूषण कोचळे यांनी ‘त्या’ दिवशीचा थरार ‘लोकमत’शी कथन केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस