शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

भरतगाववाडीचे जगताप दाम्पत्य लष्करात अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:22 AM

जगदिश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शिक्षकाला शिक्षिका, इंजिनिअरला इंजिनिअर जोडीदार हवा असतो; पण लष्करी अधिकारी असलेल्या जोडीदाराशी लग्न केल्याचे कोठे एकीवात नसेल; पण सैैनिकांच्या सातारा जिल्ह्यातच हा चमत्कार घडू शकतो. भरतगाववाडी येथील जगताप दाम्पत्य भूदल अन् नौदलात अधिकारीपदी कार्यरत आहेत. याचा भरतगाववाडी ग्रामस्थांना अभिमान वाटतो.सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील देवीकिरण ...

जगदिश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शिक्षकाला शिक्षिका, इंजिनिअरला इंजिनिअर जोडीदार हवा असतो; पण लष्करी अधिकारी असलेल्या जोडीदाराशी लग्न केल्याचे कोठे एकीवात नसेल; पण सैैनिकांच्या सातारा जिल्ह्यातच हा चमत्कार घडू शकतो. भरतगाववाडी येथील जगताप दाम्पत्य भूदल अन् नौदलात अधिकारीपदी कार्यरत आहेत. याचा भरतगाववाडी ग्रामस्थांना अभिमान वाटतो.सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील देवीकिरण विठ्ठलराव जगताप यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे १९९९ मध्ये नौदलात रुजू झाले. सध्या ते एक्झिक्युटिव्ह कमांडरपदी कार्यरत आहेत. त्यांनी आजवर आयएनएस अजय अन् आयएनस त्रिकंटवर महत्त्वपूर्ण कामगिरी सांभाळली.मुंबई येथे त्यांच्यासमवेत लिंब गोवे येथील एक सहकारी कार्यरत होत्या. त्यांनी देवीकिरण यांना भूदलात अधिकारी असलेल्या धनश्री या बहिणीविषयी लग्नासंदर्भात चर्चा केली. दोघेही एकमेकांना पसंत पडले. याविषयी घरी सांगितले असता लष्करात अधिकारी असलेली मुलगी सूनबाई होत असल्याचा आई-वडिलांना आनंदच झाला अन् साताऱ्यात ३० जानेवारी २००५ रोजी ते विवाहबद्ध झाले. त्यांना मुलगा आणि एक मुलगी जुळे आहेत.धनश्री यांचे गाव लिंब गोवे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर यूपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा देऊन भारतीय लष्करात लेफ्टनंट कॅप्टनपदी रुजू झाल्या. जिल्ह्यातील पहिल्यामहिला कॅप्टन बनण्याचा मान धनश्री यांना मिळाला. लष्करातरणगाडे जाण्यासाठी पूलबांधण्याची जबाबदारी धनश्री यांच्याकडे असते. देशसेवा करत असले तरी त्यांची गावाशी जोडलेली नाळ तुटलेली नाही. गावाकडे काही धार्मिक कार्यक्रमासाठी येत असतात.चुलते १९६५ च्या युद्धात शहीददेवीकिरण जगताप यांचे चुलते कृष्णात जगताप हे लष्कारात जवान होते. १९६५ च्या युद्धात ते शहीद झाले होते. तरीही देवीकिरण यांना सैन्यात जाण्यास कोणीही विरोध केला नाही.